Maratha Reservation News : मुख्यमंत्री मराठ्यांसाठी आजचा सुवर्ण दिवस ठरवतील, कुणबीचा जीआर निघेल ; उपोषणकर्ते जरांगेंना विश्वास

Manoj Jarange Hope : त्याबाबतचे पुरावेही आम्ही राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहेत.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama

Jalna News : आम्हाला सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण नको आहे. आम्हाला हैदराबाद संस्थानामध्ये कुणबी-मराठा असे आरक्षण होते, ते आम्हाला मिळावे, अशी आमची मागणी. त्याबाबतचे पुरावेही आम्ही राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शंभर टक्के मराठा समाजासाठी सुवर्ण दिवस ठरवतील आणि आज शंभर टक्के मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढतील, असा आशावाद जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. (Chief Minister will release GR of Kunbi Maratha reservation today : Manoj Jarange)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर जरांगे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, आरक्षणाचा विषय राज ठाकरे यांनी आमच्याकडून समजून घेतला. सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण मिळू शकत नाही. तुम्हाला राजकारणी फक्त झुलवत ठेवतील, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. ते बरोबरही आहे. पण आमची मागणी सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाची नाही.

मनोज जरांगे म्हणाले की, आमच्या दोघांतील चर्चेनंतर मराठा समाज आरक्षण नेमकं कोणतं मागतोय, हे लक्षात आल्यानंतर ते आरक्षणाबाबत सकारात्मक झाले. सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाची आमची मागणी नाही. गायकवाड आयोगाने दिलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं.

Manoj Jarange
Nana Patole On Gadkari: ...तर नितीन गडकरी होतील पंतप्रधान, नानांनी सांगितला 'फाॅर्म्यूला' !

मराठवाडा हा एक वर्षानंतर संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होता. आम्ही हैदराबाद संस्थानमध्ये असताना आम्हाला आरक्षण होतं. ते आम्हाला लागू केलं नाही. ते आम्ही त्यांना सांगिल्यानंतर त्यांच्या लक्षात आरक्षणाचा विषय आला. आम्हाला आरक्षण मिळणार नाही, राजकारणी झुलवत ठेवणार, असं त्यांच्या डोक्यात होतं, तो विषय आता त्यांच्या डोक्यातून पूर्ण निघाला आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा आणि संपूर्ण संयुक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. म्हणून आम्ही हा लढा उभा केला आहे. सर्वोच्च न्यालयातील आरक्षणाशी आमचा काही संबंध नाही. सरकारने आज बैठक लावली, समितीच्या सदस्यांकडून आज हा अहवाल घेतला आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांत मराठा कुणबी हे पुरावे सापडले आहेत. गिरीश महाजन यांनी काल जीआर काढण्यासाठी आधार मागितला होता. ते आधार आम्ही त्यांना अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Manoj Jarange
Raj Thackeray News : मुख्यमंत्र्यांशी बोलतो, त्यांना निर्णय घ्यायला लावू ; जरांगेंना राज ठाकरे म्हणाले, "नेत्यांच्या नादी लागू नका"

समितीच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे पुरावे दिले आहेत. मराठ्यांना कुणबीचे आरक्षण द्यावं. मराठा विद्यार्थी अनेक वर्षांपासून झगडत आहेत, त्यांच्या नशिबी आज सुवर्ण दिवस येऊ द्या. मुख्यमंत्री शंभर टक्के तो सुवर्ण दिवस आज आणतील. आज शंभर टक्के मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा जीआर निघेल, असेही जरांगे नमूद केले.

हैदराबाद संस्थानमधील आरक्षणाचा विषय आम्ही राज ठाकरे यांना समजावून सांगितला आहे. त्यावेळी त्यांनी काही टिप्प लिहून घेतल्या. तज्ज्ञांशी बोलतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालतो. कारण हा विषय मलाच माहिती नाही. मी खोटं सांगणं योग्य नाही, असेही त्यांनी आम्हाला सांगितले. आरक्षणाचा मुद्दा त्यांना पटला आहे.

Manoj Jarange
Maratha Reservation News : आरक्षणावर तोडगा निघणार ? बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून जरांगेना निमंत्रण ; कुणबी दाखला मिळणार ?

आम्ही एक वर्षे उशिरा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झालो आहोत. पूर्वी आम्हाला आरक्षण होतं, ते आम्हाला मिळावं, यासाठी आमचा लढा आहे. सर्वोच्च न्याायलयातील आरक्षण मिळू शकत नाही, असा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता. तसेच, आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारणी तुम्हाला झुलवत ठेवतील, असं त्यांचं मत होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com