Supriya Sule On Ajit Pawar : पवारसाहेब रिटायरमेंट घेणार होते; पण त्यामुळे अनेकांची अडचण झाली! सुप्रियाताईंचा अजितदादांना चिमटा

NCP Supremo Sharad Pawar Political Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2023 मध्ये आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर पक्षात एका प्रकारे बंड सरू झाले होते.
Ajit Pawar, Sharad Pawar,  Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sulesararnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी 2023 मध्ये आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर पक्षात एका प्रकारे बंड सरू झाले होते. तर त्यांनी ही घोषणा मागे घ्यावी म्हणून पक्षातीने नेत्यांनी त्यांची मनधरणी केली होती. याचवेळी अजित पवार यांनी पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली केल्या होत्या. तर हे संकेत ओळखून त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. यामुळे अनेकांची अडचण झाली असा चिमटा खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा काढला आहे. त्या कोल्हापूर येथे चरित्र प्रकाशन ग्रंथ सोहळ्यात भाषणादरम्यान बोलत होत्या.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मे 2023 ला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अनपेक्षित धक्का दिला होता. त्यांनी, आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. तसेच केवळ मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार असल्याचे बोलून दाखवले होते. ज्यानंतर शेकडोच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी धक्काच बसला होता. त्यांनी ही घोषणा 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यादरम्यान केली होती.

या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी डोळ्यात पाणी आणत निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. तर शेकडो कार्यकर्ते त्यांच्या निर्णयाची वाट पाहत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर ठाण मांडून बसले होते. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत आपल्या निर्णयावर फेरविचार करतील, असे म्हटले होते.

या निर्णयानंतरच अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत भापजशी जवळीक साधली होती. तर पक्ष फोडून त्यांनी 40 आमदार आपल्या सोबत घेत महायुती सरकारमध्ये सामिल झाले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यादरम्यान आता पुलाखालून बरेच पाणी गेले असून अजित पवार महायुती सरकार 2.0 मध्ये देखील उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar,  Supriya Sule
Supriya Sule : आमच्याकडे खरे वाघ, दिल्लीला मुजरा करणारे नाहीत...; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला

पण आता सुप्रिया सुळे यांनी, अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी, शरद पवार यांचे कोल्हापूरवर मोठं प्रेम आहे. यामुळे येथेच एखादे घर घेऊन रिटायरमेंटनंतर राहावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र ते काही रिटायरमेंट घेतली असे वाटतं नाही. त्यांनी आपल्या रिटायरमेंटची घोषणा मध्यंतरी केली होती. पण काय झालं? कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय मागे घ्यावा लागला. पण त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांची अडचण झाली असा चिमटा अजित पवार यांना काढला आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar,  Supriya Sule
Ajit Pawar Video : शरद पवारांच्या शेजारी अजित पवार का नाही बसले? स्वतःच सांगितले कारण, म्हणाले 'आमच्यात चर्चा झाली...'

तसेच आपला पक्ष का फुटला या मागचे कारण सांगताना, मी वारंवार खासदार धैर्यशील माने आणि आबिटकर साहेब यांना सांगत असते की तुमच्या नेत्यांनी वेळ दिला नाही म्हणून तुमचा पक्ष फुटला. मला आता ऐकायला शिकवलं आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्यात खूप शक्ती लागते. म्हणूनच मी लोकसभेला जिंकलो आहे. आरे ला का रे केलं असतं तर निवडून आलो नसतो असाही टोला अजित पवार यांचे नाव न घेता लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com