Ajit Pawar News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे सर्व दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर आली होती. विशेष म्हणजे शरद पवारांच्या शेजारीच अजित पवार बसणार होते. त्यांची नेमप्लेट देखील ठेवली होती. मात्र, नंतर ही आसन व्यवस्था बदलण्यात आली आणि शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले.
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी अजित पवारांना आसन व्यवस्थेमधील बदला विषयी विचारले असता ते म्हणाले, 'बाबासाहेब पाटलांना साहेबांशी (शरद पवार) बोलायचं होतं, म्हणून त्यांना मध्ये बसवलं. मलाही बोलता येत होतं. माझा आवाज असा आहे की दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला ऐकायला जाईल.'
अजित पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यानंतर ते अध्यक्ष बोर्ड असलेल्या दालनात गेले. तेथे शरद पवारांच्यासोबत अजित पवार यांची अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पत्रकारांनी अजित पवारांना काय चर्चा झाली असे विचारले असता ते म्हणाले, या व्यवसायाच्या करता जे प्रश्न आहेत त्याचा सुतोवाच मी केला, त्यासंदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये सहकार, एक्साईज, कृषी, ऊर्जा होतं. सरकाराच्या या विभागांचा संबंध या व्यवसायाशी, इंडस्ट्रीसोबत येतो.
कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसले होते. तर अजित पवार आणि शरद पवारांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले होते. शरद पवारांच्या डाव्या बाजुला दिलीप वळेस पाटील बसले होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार आहेत तर दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष आहेत.
पात्र नसताना देखील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर येत आहे. सरकार या महिलांकडून पैसे वसुल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की लाडक्या बहिणींकडून कोणतीही रिकव्हरी करण्याचा विचार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.