Solapur Politic's : वंचितमुळे सुशीलकुमार शिंदेंना घरी बसावं लागलं; तर प्रणितींनी आमचा उमेदवारच चोरला : सुजात आंबेडकरांची टीका

Sujat Ambedkar Statement : मागील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्या उमेदवाराने थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
Sujat Ambedkar
Sujat Ambedkar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 June : वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना घरी बसावे लागले. वंचित बहुजन आघाडीमुळे काही बिघडत नाही असे खासदार प्रणिती शिंदे म्हणत होत्या. मात्र, असं काय घडलं की, लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार चोरावा लागला, अशी घाणाघाती टीका सुजात आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर केली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (ता. 23 जून) वाढीव 76 लाख मतदाराच्या विरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मोर्चात बोलताना वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंवर (Sushilkumar Shinde) जोरदार टीकास्त्र सोडले.

मागील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्या उमेदवाराने थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तो राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेसच्या स्टेजवर होता. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसवर विशेषतः प्रणिती शिंदेंवर उमेदवार चोरल्याचा आरोप केला होता.

Sujat Ambedkar
Vanchit Aghadi :आंबेडकरांचा राहुल गांधींवर मोठा आरोप; निवडणूक आयोगाशी हातमिळवणीचा संशय, त्या पत्राकडे केले बोट!

वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपेल, अशी भीती या पक्षाच्या नेत्यांना होती, त्यामुळे यापूर्वी ज्यांनी संविधान हातात घेतले नाही, त्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि खासदार प्रणिती शिंदे यांनीही हातात संविधान घेतले. त्यांनी वंचितचा अजेंडा चोरला. आंबेडकरी चळवळीवरही घाला घातला, असा आरोप सुजाता आंबेडकर यांनी केला.

Sujat Ambedkar
Praniti Shinde : वंचितच्या नेत्याचे प्रणिती शिंदेंविरोधात वादग्रस्त विधान; ‘सेक्युलर म्हणून मतं मागायला आल्यावर चपलने मारा’

विधानसभा निवडणुकीत वाढलेले 76 लाख मतदान आले कुठून, याचा निवडणूक आयोगाने डेटा द्यावा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात. अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये, यासाठी कायदा करावा. अनुसूचित जाती जमातीच्या निधी संदर्भात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com