
Solapur, 23 June : निवडणूक डेटा डिलीट करण्यामध्ये राहुल गांधी आणि निवडणूक आयोगाची हातमिळवणी झाली आहे का? असा सवाल उपस्थित करून वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकरांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या 70 लाख मतदानाच्या विरोधात सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (ता. 23 जून) सोलापुरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाला संबाेधित करताना सुजात आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरून राहुल गांधी यांच्यावर संशय व्यक्त केला.
सुजात आंबेडकर म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांनी (Balasaheb Ambedkar) निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की, 76 लाख मतदान अतिरिक्त झाले आहे. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलं की, आपण या विरोधात एकत्र लढूयात. मात्र, त्याला खरगेंकडून काहीही उत्तर आलं नाही.
निवडणूक आयोगाविरोधात बाळासाहेब आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. त्या पत्रानंतर निवडणूक आयोगाने लगेच आदेश काढला की, 45 दिवसांत डेटा डिलीट करण्यात येईल. याचा अर्थ निवडणूक आयोग आणि राहुल गांधी दोन्ही मिळालेले आहेत आणि ते निवडणुकीतील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही सुजात आंबेडकर यांनी केला.
केवळ भाजपच धर्माच्या नावाखाली राजकारण करत नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारनेही 17 कोटी 60 हजार इतकी रक्कम धर्माच्या नावाखाली तरतूद केली आहे. इकडे भाजप नागनाथ आणि तिकडे काँग्रेस सापनाथ आहे, तुम्ही कुठेही गेलात तरी ते तुमच्या हाताला डसणारच आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएमसंदर्भात आंबेडकर म्हणाले, इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणतंय की, आमच्याकडे कोणताच डेटा नाही. बाळासाहेबांनी १२ डिसेंबर 2024 रोजी निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून माहिती मागितली होती. पाचनंतर 76 लाख मतदान झाले, हे इलेक्शन कमिटीचा डेटा सांगतोय. पण, त्यावर आम्ही आणखी माहिती मागितली आहे.
एका माणसाला मतदान करण्यासाठी किती वेळ लागतो, याचा एवरेज वेळ द्या. पाच ते सहा दरम्यान किती मतदान झाले तेही सांगा. किती टोकन तेथील ऑफिसरने वाटले? याची माहिती मागितली. पण, निवडणूक आयोग म्हणतो, आमच्याकडे कोणतीच माहिती नाही. सुमारे 75 लाख मतदान आले कुठून, ती गेली कोणाकडे ? तोपर्यंत डेमोक्रेसी ट्रान्सफर आहे, हे कसं म्हटलं पाहिजे? फसवणूक करून भाजपाचे सरकार आले आहे, असा आरोपही सुजात आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर म्हणाले, मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुखवटा घालून बसले आहेत. खऱ्या भूमिका राहुल गांधीच घेत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहिताना त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा ठेवतो. मल्लिकार्जुन खरगे यांना बाजूला करून राहुल गांधी एकतर्फी पक्ष चालवत आहेत, त्यामुळे त्यांनी हा विषय हायजॅक केला आहे. त्यांनी एक पत्र लिहिलं मात्र पत्रानंतर काहीही काही केलं नाही
आम्ही एका बाजुला म्हणतोय पुरावे द्या आणि सरकार दुसऱ्या बाजूला म्हणतेय 45 दिवसांत पुरावे नष्ट करा. एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतंय आम्ही तुम्हाला डेटा देणार नाही. बाकीच्यांना म्हणतंय की पुरावे नष्ट करा. कुठपर्यंत षडयंत्र गेलं आहे, याचा अंदाज येत असेल.
मारकडवाडीत या अन् बॅलेट पेपरवर मतदान करून दाखवा
निवडणूक आयोगाला माझे आव्हान आहे की, मारकडवाडीत या आणि बॅलेट पेपरवर मतदान करून दाखवा. मात्र, त्याबाबत आवाज उठवल्यानंतर सरकार गळचेपी करत आहे. वंचित आघाडी ही गळचेपी सहन करणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.