Swabhimani Protests : ऊसदराचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पेटणार; स्वाभिमानीचे उद्या राज्यभरात चक्काजाम

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Chakka jam In Maharashtra : ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखी आक्रमक झाली आहे...
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.

Raju Shetti
Kolhapur Politics : गोकुळनं घेतला स्वाभिमानीची धसका; दूध संकलनाबाबत 'सावध पाऊल..'

ते म्हणाले की, १३ सप्टेंबरपासून ऊसदरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ ते १५ नोव्हेंबरपर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊसदरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही ऊसदराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे हे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

राजू शेट्टी हे स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, आदी ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊसपट्ट्यात चक्काजाम आंदोलन होणार आहे.

राज्य सरकारला ऊसदरावर चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना कोणताच रस दिसत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत. कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. साखर कारखाने बंद ठेवू अशी भीती आम्हाला कारखानदारांनी दाखवू नये. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत ऊसतोडी आम्ही सुरू करू देणार नाही. तसेच आजच्या चक्काजाम आंदोलनामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, साखर कारखान्यांनी साखरेच्या गाड्यादेखील बाहेर पाठवू नयेत. चक्काजाम आंदोलनाने सरकार व साखर कारखानदारांना जाग आली नाही तर यानंतर होणारा आंदोलनाचा टप्पा अधिक उग्र होणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Raju Shetti
SugarCane FRP Issue : राजू शेट्टी आक्रमक; ‘आठ दिवस थांबा, कारखानदारांना गुडघे टेकायला लावतो’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com