Kolhapur Politics : गोकुळनं घेतला स्वाभिमानीची धसका; दूध संकलनाबाबत 'सावध पाऊल..'

Satej Patil And Raju Shetti : जिल्ह्यात स्वाभिमानीचे कार्यकर्ते गावोगावी चक्काजाम आंदोलन करणार
Kolhapur Politics : गोकुळनं घेतला स्वाभिमानीची धसका; दूध संकलनाबाबत 'सावध पाऊल..'
Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाचा गोकुळ दूध संघाने धसका घेतला आहे. रविवारी होणाऱ्या आंदोलन दरम्यान, सकाळच्या सत्रातील दूध संकलन दोन तास आधी करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व दूध संस्थांना दिल्या आहेत. त्याबाबत गोकुळचं दूध संकलन करणाऱ्या सर्व संस्थांना आवाहन केले आहे. जिल्ह्यात स्वाभिमानीचे कार्यकर्ते गावोगावी चक्काजाम आंदोलन करणार असल्याने गोकुळ दूध संघाने हा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics : गोकुळनं घेतला स्वाभिमानीची धसका; दूध संकलनाबाबत 'सावध पाऊल..'
Ajit Pawar NCP : महायुतीत लोकसभेचा तिढा; नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही, 'या' नावांची चर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावेळी नेहमी दूध टँकर यांना टार्गेट केले जाते. आंदोलनात दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला जातो. त्यामुळे गोकुळ दूध संघाने ही खबरदारी घेऊन जिल्ह्यातील दूध संस्थांना रविवारी सकाळच्या सत्रातील दूध लवकर संकलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Kolhapur Politics : गोकुळनं घेतला स्वाभिमानीची धसका; दूध संकलनाबाबत 'सावध पाऊल..'
Maratha Reservation News : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 आमदारांची मराठा आरक्षण लढ्यात उडी; घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेल्या दीड महिन्यांपासून ऊस दर आणि मागील हंगामातील उर्वरित 400 रुपये दरावरून आक्रमक झाले आहेत. कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील तीन बैठका निष्फळ झाल्यानंतर संघटनेने चक्काजाम आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील गावागावात चक्काजाम आंदोलन पार पडणार आहे.

फक्त आठ दिवस थांबण्याचे आवाहन -

कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तिसरी बैठक निष्फळ झाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आर्थिक टप्प्यात असून आता फक्त आठ दिवस थांबा, कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com