Kolhapur News, 11 Oct : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24 वी ऊस परिषद येत्या 16 ऑक्टोबरला होणार आहे. यंदा मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाविकास आघाडीने लावून धरली असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना या ऊस परिषदेमध्ये कोणती मागणी करणार? याकडे राजकीय नेत्यांचे आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिले आहे.
यंदाच्या ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नेमकी कोणती भूमिका मांडण्यात हे देखील पाहणे महत्त्वाच आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी फारकत घेतल्यानंतर घटनेची साथ सोडली.
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, तत्कालीन जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जनार्दन पाटील यांच्यासारख्या शिलेदारांनीच संघटना सोडल्यानंतर व्यासपीठावरील खुर्च्या कोणासाठी असतील? हे देखील पहावे लागणार आहे.
सांगली , कोल्हापूर , सातारा , सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10.25 टक्के रिकव्हरीचा 3550 रूपये दर गृहीत धरले जाणार आहे. त्यातून जवळपास 900 रूपये तोडणी वाहतूक वजा केली जाणार असून ऊस तुटल्यानंतर शेतकऱ्यांना पहिली उचल 2650 रूपये मिळणार आहे.
वरील वाढीव रिकव्हरीचे पैसे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर 3 महिन्यांनी हिशोब पुर्ण केल्यानंतर दिले जाणार आहे. म्हणजेच मे किंवा जून महिन्यात दुसरा हप्ता देण्याचा कुटिल डाव रचल्याचा संशय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची सुध्दा हिच परिस्थिती केली असून 9.50 टक्के रिकव्हरी गृहीत धरून 3283 रूपये 75 पैसे एफ. आर. पी. मधून 1 हजार रूपये तोडणी वाहतूक वजा करून 2283 रूपये 75 ऊसाची पहिली उचल मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शिवाय वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट या संस्थेकडून साखर कारखान्यांच्या हिशोब तपासाणीमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे थकीत एफआरपी'चे प्रमाण वाटण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात साखरेचे व सर्वच उपपदार्थांचे वाढलेले दर यामुळे साखर कारखान्यांनी चांगला पैसा कमविला आहे. गेल्या पाच वर्षात 650 रूपयांनी एफ. आर. पी. वाढली. मात्र शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात 3 हजाराच्या वरती दर मिळाला नाही. कारण वाढलेली एफ. आर. पी. तोडणी वाहतूक व रिकव्हरी बेस वाढवली यामध्ये गेली आहे. खते , बि -बियाणे , किटकनाशके , मजूरी यामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे.
साखर कारखान्यात काटामारी व रिकव्हरी चोरी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काटामारी व रिकव्हरी चोरी यामधून प्रतिटन 500 ते 700 रूपयाचा तोटा,महापूर व अतिवृष्टीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने ऊसाचा उतारा एकरी 10 ते 12 टन घटण्याची शक्यता आहे.
उसतोडणीसाठी मुकादम व मजूराकडून लूट केली जात आहे. एक एकर ऊस तोडणीसाठी जवळपास 5 ते 10 हजार इतका खर्च येवू लागला आहे. राज्य सरकार व राज्य साखर संघ हे दोघे मिळून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन टप्यात एफ. आर. पी. देण्याचा घाट घातला आहे. सर्व मुद्द्यांवरून यंदाची स्वाभिमानीची ऊस परिषद गाजण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.