
Sangli News : लोकसभा निवडणुकीनंतरचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्या टर्ममधला पहिलाच अर्थसंकल्प शनिवारी(ता.1)सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठवा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी संतप्त प्रतिक्रिया देतानाच मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
अर्थसंकल्पात (Budget) मोदी सरकारनं मध्यमवर्गीयांसह कृषी,आरोग्य, शिक्षण,उद्योग यांसह विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करतानाच सरकारनं मोठा समतोल साधल्याचं पाहायला मिळालं आहे. पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतीक्षेत्रासाठी निराशाजनक असून यामध्ये मोठ मोठ्या घोषणा व पोकळ वलग्णा केल्या गेल्या असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर बोलताना दिली.
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे मात्र या कृषीप्रधान देशात कृषीक्षेत्राचे हब बनविण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनविण्याची घोषणा जर हे सरकार करत असेल तर या केंद्र सरकारचा शेती क्षेत्राबाबतचा दृष्टीकोन यामधून स्पष्टपणे दिसून येतो. वास्तविक पाहता आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा वाढविली , डाळींच्याबाबतीत देश आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली असल्याचंही शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.
धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली मात्र हे सर्व करत असताना , सिंचन तसेच पायाभूत सुविधांचा कोणताच निर्णय यावेळी घेण्यात आलेला नाही. खते , बि-बियाणे , किटकनाशके , शेती औजारे यावरती ६ टक्यापासून ते ३० टक्यापर्यंत जीएसटी लावण्यात आलेली आहे ,यामधून जीएसटी करामध्ये सवलत देवून शेती व्यवसायाला बुस्टर डोस देण्याची गरज होती असंही मत माजी खासदार शेट्टींनी व्यक्त केलं.
तसेच एकीकडे वाढलेली महागाई , नैसर्गिक आपत्ती , केंद्र सरकारचे आयात निर्यातीबाबतचे अस्थिर धोरण , पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशभरातील शेतकरी पिचलेला आहे. डाळीबाबत आत्मनिर्भर होण्याच स्वप्न पाहणा-या देशात उद्योगपतींच्या फायद्यासाठी सर्वाधिक डाळ व तेलबिया आयात केल्या जातात असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात शेतक-यांच्या शेतीमालाला चांगले भाव मिळतात तेंव्हा निर्यातबंदी लावली जाते. देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. शेती व वस्त्रोद्योग क्षेत्रात सर्वाधिक शाश्वत रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, मात्र याकडे केंद्र सरकारने पुर्णता: दुर्लक्ष करून देशभरातील शेतक-यांना या अर्थसंकल्पातून शाश्वत असे काहींच मिळाले नसल्याची टीकाही शेट्टी यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.