Ahmednagar : शिक्षक बँकेच्या चाव्या 'गुरू'माऊलीच्या हाती?

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुजींनी आज प्रगल्भता दाखवत 98 टक्के मतदान केले.
Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar NewsSarkarnama

अशोक निंबाळकर

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या ( Ahmednagar District Primary Teachers Bank ) संचालक मंडळासाठी आज (रविवारी) चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत चार मंडळे आघाडी करून उतरली होती. गुरुमाऊलीची दोन आणि सदिच्छा व गुरुकुल, अशा चार प्रमुख मंडळांनी नेतृत्व केले. 21 जागांसाठी शांततेत मतदान झाले. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत 97.79 टक्के मतदान झाले. 10 हजार 233 मतदारांनी (10 हजार 464 पैकी) हक्क बजावला. मतमोजणी नेप्ती रस्त्यावरील अमरज्योत मंगल कार्यालयात उद्या (ता. 17) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत मतदान केंद्र होती. तरीही उत्तरेतील अकोले, संगमनेर हे तर दक्षिणेतील नगर आणि पारनेर तालुक्यांवर सर्वच मंडळांनी लक्ष्य केंद्रीत केले होते. सत्ताधारी गुरुमाऊली मंडळ (बापू तांबे गट), सदिच्छा आणि बहुजन आघाडी (राजू शिंदे), गुरुकुल आणि गुरुमाऊली रावसाहेब रोहकले गट यांच्यात सरळ लढत झाली.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक सभेत पुन्हा गदारोळ

गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी नगरमधील केंद्रावर मतदान केले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील केंद्रांना भेटी दिल्या. गुरुकुलचे नेते संजय कळमकर यांनी नेवाशातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. गुरुमाऊली (रोहोकले गट) गटाच्या प्रवीण ठुबे यांनी पारनेरमध्ये मतदान केले.

मतदानासाठी सकाळपासून उत्साह होता. सकाळी आठ ते दहावाजेपर्यंत दोन हजार 353 जणांनी मतदान केले होते. ती आकडेवारी 22.49 टक्के होती. दुपारी दोन वाजेपर्यंत 8 हजार 33 जणांनी (76.77) मतदान केले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 10 हजार 233 जणांनी (97.79) हक्क बजावला.

विकास मंडळासाठीही मतदान झाले. तालुक्यात एकच मतदान केंद्र असल्याने मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एका मतदान केंद्राबाहेर कोरी मतपत्रिका आढळल्याची चर्चा सोशल मीडियात फिरत होती.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
‘शिक्षक`मध्ये ‘पदवीधर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपचा सावध पवित्रा

तांबेंमुळेच मंडळाचे सोने

दुपारी बारा वाजेपर्यंत मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे. शेवटच्या टप्प्यात सदिच्छा आघाडीने गुरुमाऊलीला आव्हान निर्माण केले होते. दुसरीकडे गुरुकुलनेही विजयाचा दावा केला आहे. रोहोकले गटालाही विजयाची खात्री आहे. प्रत्येक केंद्रावर पाच मतपत्रिका होत्या. काही ठिकाणी क्रॉस वोटिंगची शक्यता आहे. त्यामुळे काही जागांवर दगाफटक्याची भीती आहे. तांबे गटाचे कार्यकर्ते हजाराच्या फरकाने जिंकण्याचा दावा करत आहेत. त्यांच्यामुळेच मंडळाचे सोने होईल, अपेक्षा त्यांची अपेक्षा आहे. प्रत्येक मंडळानेच विजयाचा दावा केला असला, तरी मतदारांनी नेमक्या कोणाच्या हातात बँकेच्या चाव्या दिल्या, हे उद्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

मतदान केंद्रनिहाय टक्केवारी

संगमनेर- 1 - 96.57, संगमनेर- 2 - 98, संगमनेर- 3 - 97.21, नगर- 4 - 97.63, नगर- 5 - 96.14, पारनेर- 6 - 98.12, पारनेर- 7 - 97.65, कोपरगाव - 8 - 97.54, कोपरगाव 9 - 97.92, राहाता- को. 10 - 97.99, राहाता- श्रीरा. 11 - 98.33, श्रीरामपूर- 12 - 99.14, जामखेड - 13 - 97.72, पाथर्डी - 14 - 99.47, पाथर्डी - 15 - 98.40, राहुरी - 16 - 98.97, राहुरी- 17 - 96.16, शेवगाव - 18 - 97.58, शेवगाव- 19 - 98.22, श्रीगोंदे- 20 - 97.81, श्रीगोंदे - 21 - 97.81, श्रीगोंदे - 22 - 97.78, अकोले - 23 - 96.76, अकोले - 24 - 97.65, अकोले - 25 - 95.86, नेवासे - 26 - 97.67, नेवासे - 27 - 97.67, नेवासे - 28 - 97.08, कर्जत - 29 - 99.41, कर्जत - 30 - 98.27.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
NCP : ‘राष्ट्रवादी’च्या नगर जिल्हा महिला अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

निवडणुकीत गुरुमाऊली आघाडी कारभाराच्या मुद्यावर सामोरे गेली. ही निवडणूक सभासदांनीच हाती घेतली होती. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला. आमचाही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी दिलेल्या कौलाचा आम्ही सन्मान करतो. आमच्या आघाडीला त्यामुळेच विजयाची खात्री आहे.

- बापूसाहेब तांबे, (नेते, गुरुमाऊली तांबे गट)

उद्या आम्हीच जिंकणार, असा दावा होत आहे. परंतु निकालानंतरच ठरेल कोण विजयी होईल. कोणताही आकांडतांडव न करता निवडणुकीला सामोरे गेलो. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढतच राहू. मतदानानंतर नेवाशात सर्वच मंडळांचे उमेदवारांनी एकत्र बसून चहापान केले. हीच प्रगल्भता शिक्षक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दाखवू.

- संजय कळमकर (नेते, गुरुकुल)

रोहोकले गटाला मानणारे आणि विरोध करणारे अशा मुद्यांवर ही निवडणूक लढवली गेली. आमचा गट शाबूत होता. परंतु विरोधकांत तीन गट पडले होते. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. विकास मंडळाच्या जागेबाबत रोहोकले गुरुजींनी चांगला निर्णय घेतला होता. परंतु काहींनी तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. सभासद पुन्हा एकदा आम्हाला कौल देतील.

- प्रवीण ठुबे (गुरूमाऊली, रोहोकले गट)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com