आंधळकरांना २१ कोटी भरण्यासाठी शेवटची नोटीस

इंदूताई आंधळकर (Indutai Andhalkar) यांना 21 कोटी 32 लाख 8 हजार 400 रुपये भरण्याबाबत तहसीलदार यांनी अंतिम नोटीस दिली आहे.
Bhausaheb Andhalkar
Bhausaheb Andhalkarsarkarnama

बार्शी : जमीन महसूल थकबाकी प्रकरणी सौंदरे ता. बार्शी (Barshi) येथील इंदूताई आंधळकर (Indutai Andhalkar) यांना 21 कोटी 32 लाख 8 हजार 400 रुपये भरण्याबाबत तहसीलदार यांनी अंतिम नोटीस दिली आहे. (शिवसेना (ShivSena) नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या त्या मातोश्री आहेत) अशी माहिती तक्रारदार माजी नगरसेवक (Corporator) प्रशांत कथले व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आंधळकर यांनी उत्खननाचे आरोप राजकीय दबावातून होत असल्याचे म्हटले होते. तसेच या नोटीसीला स्थगिती द्यावी, अशी मागणी आंधळकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. आंधळकर यांना बार्शीचे तहसीलदार सुनिल शेरखाने यांनी 10 जून 2021 व 20 जुलै 2021 ला दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, सौंदरे येथील गट नं 446/2 दगडखाणीची मशिनद्वारे तांत्रिक मोजणी केली. यामध्ये 31 हजार 78 ब्रॉस उत्खनन केले. तर गट नं 450 / 2 मध्ये 2 हजार 285 ब्रॉस उत्खनन केल्याचे निदर्शनास आले. भरणा केलेल्या रॉयल्टीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केले आहे, असे म्हटले होते.

Bhausaheb Andhalkar
दोन कॅबिनेट मंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांना तुरूंगात टाकण्याची ईडीची तयारी; राऊतांचा गौप्यस्फोट

तहसीलदारांनी दिलेल्या नोटीसीच्या विरोधात शिवसेना (ShivSena) नेते भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यामध्ये म्हटले होते की ''तहसीलदार सुनिल शेरखाने यांनी 2010 ते 27 डिसेंबर 2020 खाण परवाना असताना गौण खनिजाचे उत्खनन केले. खनिज परवाना असताना नोव्हेंबर 2020 मध्ये त्याची मोजणी झाली. त्याला अवैध ठरवून बेकायदेशीर नोटीस दिली. आम्हाला अपिलात जाण्याचे अधिकार आहेत. वैध उत्खननास अवैध उत्खनन म्हणून बेकायदेशीर कारवाईमुळे आमचे कुटुंब उध्वस्त होणार आहे. त्यामुळे मी व माझी आई इंदूताई आंधळकर (वय 84) विष प्राशन करुन 26 जानेवारी रोजी आत्महत्या करणार आहोत, असा इशारा दिला होता.

तसेच आत्महत्येस राजेंद्र राऊत, तहसीदार सुनिल शेरखाने, रणवीर राऊत, पिंटु खराडे, रावसाहेब मनगिरे, नाना राऊत, प्रशांत कथले, नागेश नान्नजकर, नायब तहसीलदार मुंढे यांना जबाबदार धरुन आमच्या मरणानंतर हा मृत्यूपूर्व जबाब समजून त्यांचेवर खोटी कागदपत्रे बनवणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे याबद्दलचा गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करावी. आमचा आणि आंधळकर यांचा वैयक्तीक काहींही संबध नसताना गौण खनिजबाबत वेगवेगळ्या ठिकाणी 26 तक्रारी दिल्या आहेत. म्हणणे सादर करा असे आदेश झाले आहेत. त्यामध्ये पाच पट दंड शासनाने दिला आहे.

Bhausaheb Andhalkar
देशमुखांनी वसुली सांगितली का? चांदीवाल समितीसमोर वाझेने मारली पलटी

माझी आई इंदूताई आंधळकर यांचा खाणपट्टा परवाना अधिकृत असून वैध आहे. रॉयल्टी व दंडाबाबतची तहसीलदारांनी बजावलेली नोटीस ही बेकायदेशीर आहे. या विरोधात प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शासन, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय येथे अपिल करण्याचे अधिकार अबाधित आहेत, तेथे दाद मागू शकतो, असे पत्रात म्हटले होत. मात्र, त्यानंतरही आंधळकर यांना दंड भरण्यासाठी नोटीस दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com