Shivsena UBT : '...तर माफी मागा, कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', उद्धव ठाकरे गट आक्रमक

Shivsena UBT On Manikrao Kokate : राज्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात बोलण्याचा सपाटाच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लावला आहे. आताही कोकाटे यांनी शेतकरीविरोधी वक्तव्य केल्याने मोठा संताप व्यक्त केला जातोय.
Shivsena UBT On Manikrao Kokate
Shivsena UBT On Manikrao Kokatesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आताही त्यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य करून खळबळ उडून दिली आहे. यावरून राज्यात संतप्त भावना व्यक्त केल्या जातायत. शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुडा आणि लग्नात खर्च करतो असे त्यांनी वक्तव्य केल्यावरून रोष व्यक्त होताना त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा, अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांसह राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. तर कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांचे मन दुखावणाऱ्या कोकाटेंनी शेतकऱ्यांची माफी मागितली असली तरी त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे सेनेचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार व सह संपर्क प्रमुख विजय विजय देवणे यांनी पत्रकातून केली आहे.

या पत्रकातून कोकाटे यांनी, शेतकरी विरोधी वक्तव्य करत राज्य शासनाची शेतकऱ्यांबाबतची भावना व्यक्त केली आहे. महायुतीचे सरकारच शेतकरी विरोधी आहे. हे सरकार सातत्याने राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. या सरकारचे सध्याचे धोरणच शेतकऱ्यांचा अपमान करणारे असल्याने महायुतीतील अशा राज्यकर्त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. यामुळे कोकाटे यांचे मंत्रिमंडळ महाकालपट्टी करा, अशी मागणी करण्यात आली आहे

शिवसेना नेते संजय पवार यांनी, शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपूडा आणि लग्नात खर्च करतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेय. त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकरी या देशाचा कणा असून त्यांच्या कष्टावरच हा देश चालतो, आता हेच कोकाटे विसरलेत कदाचित.

Shivsena UBT On Manikrao Kokate
Manikrao Kokate Statement : आधी बरळले अन् आता मागीतली माफी

निसर्गाचा लहरीपणा, खराब हवामानामुळे राज्यातील शेतकरी आधीच अडचणीत आला असून शासनाच्या नाकर्तेपणामुळे तो हवालदील झाला आहे. मेटाकुटीला आलेला शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला गेला आहे. यामुळे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. याची जाणीव कोकाटे यांना नसावी. शेती आणि शेतकरी याची दुखणे माहीत नसणारा कृषिमंत्री राज्याला मिळणे हेच दुर्दैव असल्याचेही पवार यांनी यावेळी म्हटले आहे

दरम्यान याआधी देखील कोकाटे यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य केली असून न्यायालयाने देखील त्यांची काय योग्यता आहे हे दाखवून दिले आहे. अशा व्यक्तिकडून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडून तशी अपेक्षाच करणे चुकीचे असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच यावेळी ठाकरे गटाने महायुती सरकार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे गाजर दाखवले होते. पण अद्याप ही दोन्ही आश्वासने पूर्ण झालेले नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणींना आजही पंधराशे रुपये मिळत असून कर्जमाफीचा तर पत्ताच नाही.

Shivsena UBT On Manikrao Kokate
Manikrao Kokate : शिवसैनिकांनी कोकोटेंचा पुतळा फासावर लटकवला!

उलट आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तर आपण आपल्या कोणत्याच भाषणात कर्जमाफीचा मुद्दा बोललोच नाही, अशी भूमीका घेतली आहे. त्यामुळे खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या महायुती सरकारला शेतकरीच जागा दाखवतील. महायुतीला जर कर्जमाफी शक्य नसेल तर त्यांनी जाहीरपणे राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी असाही हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com