Solapur kidnapping Case : तीन महिन्यांपूर्वीचा तो व्हिडिओ अन्‌ शरणू हांडेचे अपहरण; काय सांगते कनेक्शन?

Crime News : संशयित आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून काही शस्त्रासह इतरही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्या वस्तू बाळगण्यामागे त्यांचा काय हेतू होता, असा सवाल उपस्थित होत आहे.
Amit Survase-Sharanu Hande
Amit Survase-Sharanu HandeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 August : सोलापुरातील शरणू हांडे याचे अपहरण करून त्याला घेऊन जाताना पोलिसांनी कर्नाटकातील झळकीजवळ पकडले. या प्रकरणी अमित सुरवसेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा गदरोळ उठलेला असतानाच तीन महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो या अपहरण प्रकरणामागचे कारण नाही ना?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसही त्या दिशेने तपास करण्याची शक्यता आहे. कारण पोलिस आयुक्तांनी तीही शक्यता बोलून दाखवली आहे.

शरणू हांडे (Sharanu Hande) हा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता आहे, तर अमित सुरवसे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा कार्यकर्ता आहे. अमित सुरवसे आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी शरणू हांडे याला अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातून पळवून नेले हेाते. त्याला पुण्यातून भाड्याने घेतलेल्या एका मोटारीतून कर्नाटकच्या दिशेने सुरवसे आणि इतर पाच जण घेऊन जात होते. मात्र, काही अंतर गेल्यावर त्यातील दोघे खाली उतरले.

दरम्यान, पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच भाड्याने घेतलेल्या मोटारीच्या कार्यालयातून नंबर आणि इतर गोष्टी मिळविला. त्या गाडीला जीपीएस यंत्रणा असल्यामुळे तपासासाठी पोलिसांना सोपे झाले. ती मोटार कर्नाटकच्या (Karnataka) दिशेने जात असताना पोलिसांनी पाठलाग सुरू केला आणि झळकीजवळ हांडेची सुटका केली. तसेच चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींकडून हत्यारासह साडी, कंडोमची पाकिटे, फटक्याची माळ, ट्रायपॉड जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी हे साहित्य का नेले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मारहाणीमागे राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले तरी त्यामागे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याचे कारण आहे का,याचीही चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे.

Amit Survase-Sharanu Hande
Rohit Pawar : ‘माझ्या फोनवर व्हिडिओ कॉलची सुविधाच नाही, मी माझ्या बायकोशीच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हांडे कोण लागून गेला’?

शरणू हांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी अमित सुरवसे आणि त्याचा एका मित्राला जबर मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आला होता, त्यामुळे आपली बदनामी झाल्याची भावना सुरवसे याच्या मनात होती. कारण, त्या व्हिडिओमध्ये अमित सुरवसे हा हांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांना सोडून दे विनवणी करत होता. मात्र, हांडे आणि त्याचे सहकारी लाथाबुक्यानी मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.

अमित सुरवसे हा आपण एकमेकांचे मित्र आहोत, जाऊदे रे अण्णा, आपली दुश्मनी होती का, अशी विनंती करत होता. त्या वेळी शरणू हांडे हा आपण किती वेळा भेटलो रे...असे विचारले. त्यावेळी अमित हा दहा वेळा भेटल्याचे सांगतो. पण आपण सात ते आठ वेळा भेटलो होतो. एका टपरीजवळही तू आगाऊपणा केला होता, असे हांडे हा सुरवसेला सांगत होता. तेवढ्यात सुरवसे हा साहेबांची शपथ घेऊन सांगतो, असे म्हणत असतानाच सुरवसे हा ‘ये आई...कुठल्या साहेबांची... कुठल्या साहेबांची’ म्हणत शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Amit Survase-Sharanu Hande
Gopichand Padalkar : ‘शरणू हांडे प्रकरणाचे रोहित पवार मास्टरमाईंड; कार्यकर्त्यांत वाद कशाला लावता? मी बारामतीत कोठे येऊ सांगा?’

शरणू हांडेकडून मारहाण झालेल्या व्हायरल व्हिडिओमुळे सुरवसे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हांडेलाही मारहाण करून व्हिडिओ बनविण्याचा विचार होता की काय, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. आयुक्त एम. राजकुमार यांनीही त्याबाबत स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com