Kolhapur Politics : महायुतीत मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? प्रचंड रेस, पण सस्पेन्स कायम

Mahayuti BJP NCP ShivSena Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दहाही जागावर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर जिल्ह्यात कोणाला आणि किती मंत्री पद मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली.
Kolhapur Politics 1
Kolhapur Politics 1Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात दहाही जागावर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर जिल्ह्यात कोणाला आणि किती मंत्री पद मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तिन्ही आमदार तीन वेळा निवडून आल्याने प्रत्येकाने मंत्रीपदावर दावा केला आहे. तर भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आल्याने त्यांचाही मंत्रीपदावर दावा कायम आहे.

राज्यमंत्रीपद असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकरांनी देखील मंत्रीपदावर दावा केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद निश्चित आहे. अन्य मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा सस्पेन्स कायम आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेतच मंत्रिपदावरून आता रेस निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकतर्फी सत्ता देत दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवारांचा विजय झाला. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) चार (यड्रावकर यांच्यासहित) भाजपचे तीन (शिवाजी पाटील यांच्यासहित), राष्ट्रवादी काँग्रेसची एक, जनसुराज्य शक्तीचे दोन यांचा समावेश आहे. ज्येष्ठता आणि अनुभव या सूत्रानुसार मंत्रीपद द्यायचे झाल्यास कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित समजले जाते. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून चार आमदार असल्याने कोणाला मंत्रीपदाची संधी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Kolhapur Politics 1
Rajesh Kshirasagar on Hasan Mushrif : मुश्रीफांच्या सहकारातील भूमिकेवर क्षीरसागरांनी नाराजी व्यक्त करत दिला 'हा' इशारा, म्हणाले ...

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील मंत्रिपदावर दावा केला आहे. तर महाविकास आघाडीच्या (MVA) काळात राज्यमंत्रीपदावर असल्याने यड्रावकर यांना संधी मिळेल, अशी ही शक्यता नाकारता येत नाही. करवीर विधानसभेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीदेखील तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मंत्रिपदावर दावा केला आहे. तर राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी हॅट्रिक केल्यानंतर आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मंत्रिपदाचा शब्द दिल्याने मंत्रिपदाची माळ अबिटकर यांच्या गळ्यात पडणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

Kolhapur Politics 1
Ranjitsinh Mohite Patil : आक्रमक भाजप नेत्याविरोधात रणजितसिंह मोहिते पाटील यांची दमदार खेळी; थेट प्रदेशाध्यक्षांकडेच लावली फिल्डिंग

भाजपकडून अमल महाडिक हे दुसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत, हा त्यांच्यादृष्टीने मंत्रीपद मिळण्याचा महत्त्वाचा निकष आहे. तर भाजपचे आमदार राहुल आवाडे हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेत. त्यामुळे यांच्या मंत्रिपदाची शक्यता कमीच आहे. तर दुसरीकडे जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी आघाडीच्या काळात मंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. ज्येष्ठता आणि अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पण मंत्रिपदातून नाराजी निर्माण झाली तर घटक पक्षांकडून वेगळा निर्णय होण्याची शक्यता नाही. याचा विचार करता सद्य:स्थितीत ‘जनसुराज्य’ला मंत्रिपद मिळणार का नाही? याविषयी उत्सुकता आहे.

मुश्रीफ, आबिटकर आणि पाटील रेसमध्ये...

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री कोण असणार हे भाजपच ठरवण्यात असे एकंदरीत चित्र आहे. कारण सत्तेतील सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पूरक चेहरा भाजपला देणे गरजेचे आहे. त्यातच घटक पक्षातील मंत्रिपदाचा चेहरा भाजपच ठरवणार अशी शक्यता आहे. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पदाचा अनुभव आहे. तेव्हा त्यांनी आघाडी आणि माहितीच्या काळात महत्त्वाच्या पदांची जबाबदारी हाताळली आहे. अशातच मंत्रीपदाचा चेहरा हा जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतून प्रकाश आबिटकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर पालकमंत्री पदावर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात आणण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com