Congress News : मोदी-अदानी युतीमुळे देशाची लोकशाही धोक्यात...पृथ्वीराज साठे

Prithviraj Sathe संरक्षण विभागाची कंत्राटे चिनी कंपन्यांना देऊन देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जात आहे, असा आरोप पृथ्वीराज साठे यांनी केला.
Prithviraj Sathe, Dr. Suresh Jadhav, Ranjitsinh Deshmukh, Udayasinh Undalkar
Prithviraj Sathe, Dr. Suresh Jadhav, Ranjitsinh Deshmukh, Udayasinh Undalkarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Ghandhi यांनी अधिवेशनात अदानींविषयी विचारलेल्या प्रश्नांची मिरची मोदी सरकारला लागली असून यातूनच त्यांची खासदारकी गुजरात खटल्याचे निमित्त करून रद्द केली आहे. हा राजकीय कटाचाच एक भाग आहे. मोदी-अदानी Modi-Adani युतीमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव पृथ्वीराज साठे Prithviraj Sathe यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

श्री. साठे म्हणाले, देशाच्या राजकिय पटलावर अनेक घटना घडल्या असून त्यानुसार राष्ट्रीय काँग्रेसने ३१ मार्चपासून राष्ट्रीय पातळीपासून ते गावपातळीपर्यंत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहोत. मोदी अदानी या युतीची माहिती लोकांना देण्याचे काम हाती घेतले आहे. खासदार राहुल गांधी यांना अचानकपणे दोन वर्षे शिक्षा सुनावून त्याची खासदारकी रद्द केली.

दिल्लीच्या शासकिय निवासस्थानातून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. सात फेब्रवारीला मोदी अदानी संबंधांचे मुद्दे संसदेत उपस्थित केले. राहुल यांनी असे काय मुद्दे उपस्थित केले, ज्याची मिरची मोदी सरकारला लागली. सत्ताधारी पक्षाचे खासदार आधिवेशन चालू देत नाही हे अनाकलनिय आहे. अदानीच्या बंधूंच्या सेल कंपनीतील वीस हजार कोटीची गुंतवणूक कोणाची? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Prithviraj Sathe, Dr. Suresh Jadhav, Ranjitsinh Deshmukh, Udayasinh Undalkar
Lalit Kumar Modi Tweet : मोदींकडून नेहरुंचा तो फोटो शेअर ; नव्या वादाला तोंड फुटलं ; काँग्रेस आक्रमक..

संरक्षण विभागाची कंत्राटे चिनी कंपन्यांना देऊन देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जात आहे, असा आरोप पृथ्वीराज साठे यांनी केला. पंतप्रधान मोदी देशासाठी जातात की अदानीच्या कंपनीचे ब्रॅण्डिंग करायला असा टोला त्यांनी लगावला. एलआयसी कंपनी सुध्दा अदानी समूहाच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचे काम मोदींनी केले. राहुल गांधी यांची खासदारकी का रद्द केली? याचे स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Prithviraj Sathe, Dr. Suresh Jadhav, Ranjitsinh Deshmukh, Udayasinh Undalkar
Global Support To Rahul Gandhi: राहुल गांधींना जागतिक स्तरावर वाढता पाठिंबा; आता जर्मनी उतरली मैदानात

मोदी अदानी युतीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे निघाल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. अदानी मोदींचा कारभार थांबवून देश वाचविला पाहिजे, त्यासाठी ही जनजागृती सुरु असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उदयसिंह उंडाळकर, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, रजनी पवार, अजित पाटील चिखलीकर, धनश्री महाडिक, मालन परळकर, रजिया शेख, अरबाज शेख, आदी उपस्थित होते.

Prithviraj Sathe, Dr. Suresh Jadhav, Ranjitsinh Deshmukh, Udayasinh Undalkar
Modi-Adani Photo's : कधी आणि कसे झाले पंतप्रधान मोदी-अदानी मित्र?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.