

Solapur, 09 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणींवर आज रात्रीपासून विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी लेखी आदेश देण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश हरकतदारांना आता उद्या (शनिवार, ता. १० ऑक्टोबर) आदेश मिळणार आहे. या आदेशावर हरकतदार काय करणार?, शांत बसणार की अपिलात उच्च न्यायालयात जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर त्यावर ३५५ हरकती, सूचना दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर जिल्हा बँकेचे निबंधक तथा विभागीय सहनिबंधक आहेर यांच्यासमोर ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान सुनावणी झाली.
मतदार यादीतील वेळापत्रकानूसार आज (ता. ०९ ऑक्टोबर) सुनावणीचा निर्णय जाहीर करण्याचा दिवस होता. आज दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सुनावणीचा आदेश तयार करण्याचे काम विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुरू होते.
हा आदेश घेऊनच हरकतदारांना अपिलात जाता येणार आहे. बँकेच्या दुग्ध मतदारसंघातून सर्वाधिक हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या शिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी केलेल्या ठरावावरही आक्षेप घेण्यात आला आहे. सहनिबंधक आहेर यांच्यासमोर कायद्याचा किस पाडत सुनावणी झाली आहे. या सुनावणीनंतर सहनिबंधक आहेर काय निर्णय देणार? याकडे पुढील घडामोडी अवलंबून आहेत.
येत्या बुधवारी (ता. १४ ऑक्टोबर) अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच कोणाची नावे वगळली आणि कोणाची नावे कायम राहिली? याची माहिती सर्वसामान्यांना मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.