बिजवडी : महाविकास आघाडीची ओबीसींना आरक्षण देण्याची मानसिकता आजिबात नव्हती. ते सरकारच ओबीसींच्या विरोधात होते. त्यांना आरक्षणाविनाच निवडणूका घ्यायच्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत न्यायालयात हवी ती माहिती देण्याची सुचना आयोगाला केली आणि ओबीसींना आरक्षण मिळाले. याचे सारे श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आहे, असे स्पष्ट मत माण, खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात आवश्यक माहिती देण्याची सूचना आयोगाला केली होती. त्यानुसार माहिती दिल्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. यासंदर्भात भाष्य करताना भाजपचे आमदार जयकुमार गोरे म्हणाले, मुळात महाविकास आघाडीची ओबीसींना आरक्षण देण्याची मानसिकता आजिबात नव्हती. ते सरकारच ओबीसींच्या विरोधात होते. त्यांच्या नेत्यांना आरक्षणाविनाच निवडणूका घ्यायच्या होत्या.
गेल्या दोन वर्षात त्या सरकारने आयोगाची स्थापना करुन न्यायालयाला इंपेरिकल डाटा देणे गरजेचे होते. मात्र, ही जबाबदारी केंद्राची आहे अशी खोटी माहिती ते सरकार जनतेला देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत आयोगाला न्यायालयात हवी ती माहिती देण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे न्यायालयाला माहिती देण्यात आली आणि ओबीसींना आरक्षण मिळाले. याचे सारे श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आहे, असे आमदार गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.