Border Dispute : बेळगावला जाणार असा नारा देणारे महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांनी शेपूट घातली, अशी टीका उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली आहे.
कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून महाराष्ट्रातील मंत्र्यांनी येऊ नये, असे सांगितले होते. त्यावर आक्रमक होत भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आम्ही जत तालुक्यातील गावांसह बेळगावला जाणारच असे जाहीर केले होते. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने त्या दिवशी गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी जाण्याचे टाळले होते.
त्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा चिघळला. कानडीग्यांनी महाराष्ट्राची वाहने तेथे आडवून त्यांची ताेडफोड केली. तर कर्नाटकच्या एसटी बसला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसैनिकांनी काळे फासले. या वादावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा केंद्राच्या पाठींब्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारला एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. बेळगावसह सीमा भाग केंद्रशासित करा. अन्यथा महाराष्ट्राला वेगळी पावले उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच तुमचे सरकार गेलं खड्ड्यात. सीमावाद करुन महाराष्ट्राला कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमुद केले. महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांनी बेळगावाला जाण्याचा नारा दिला होता. पण, ऐनवेळी या मंत्र्यांनी शेपूट घातली, अशी टीकाही त्यांनी शिंदे-फडवीस सरकारमधील मंत्र्यांवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.