Girish Majahan News : पायलटचे प्रसंगावधान अन् गिरीश महाजन थोडक्यात बचावले...; नेमकं घडलं काय?

Satara Politics : मंत्री महाजन यांचे विमान बराचकाळ हवेतच होते.
Girish Majahan News :
Girish Majahan News : Sarkarnama
Published on
Updated on

Karhad News : कराडच्या विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. त्याअंतर्गत तीन ते चार विमानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. आज ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन येथील विमानतळावर उतरून सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना होणार होते. त्यासाठी त्यांचे विमान १० वाजून ५० मिनिटांनी येथील विमानतळाच्या हद्दीत आले. मात्र, त्यांच्या विमानाच्या पायलटला ट्रेनिंग सेंटरचे एक विमान हवेत आणि एक धावपट्टीवर दिसले. त्यामुळे त्या पायलटने विमान उतरण्याचा धोका न पत्करता हवेतच काही काळ विमान स्टे करून धावपट्टी क्लीअर झाल्यावर विमान उतरवले. विमान उतरल्यानंतर मंत्री महाजन आणि पायलट या दोघांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

Girish Majahan News :
Vanchit Bahujan Aghadi News : काँग्रेसचे खासदार म्हणतात, आंबेडकरांकडून प्रस्ताव यायला हवा, प्रवक्त्याचा नको !

पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती विमानतळ म्हणून येथील विमानतळाची गणना केली जाते. या विमानतळावर सध्या ट्रेनिंग सेंटर सुरू आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, आज सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमास रवाना होण्यासाठी मंत्री गिरीश महाजन येथील विमानतळावर उतरणार होते. त्यासाठी भाजपचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलिसांचा लवाजमा साडेनऊ वाजल्यापासूनच विमानतळावर तैनात होता. शासकीय दौऱ्याच्या सुमारे तासभर त्यांना यायला उशीर झाला.

दरम्यान, त्यांचे व्हीटीएनकेएफ हे विमान कऱ्हाड विमानतळाच्या परिसरात आल्यावर ते लगेच उतरतील, यासाठी विमानतळाची यंत्रणा सज्ज झाली होती. मात्र, त्याचदरम्यान मंत्री महाजन ज्या विमानाने आले त्या विमानाच्या पायलटला ट्रेनिंग सेंटरचे एक विमान धावपट्टीवर तर एक हवेत दिसून आले. त्या पायलटने त्याची कल्पना मंत्री महाजन यांना दिली. दरम्यान, ट्रेनिंग सेंटरचे संबंधित विमान काही काळाने बाजूला गेले.

मात्र, त्यादरम्यान मंत्री महाजन यांचे विमान बराचकाळ हवेतच होते. पायलटने विमान उतरण्याचा धोका न पत्करता हवेतच काही काळ विमान थांबवून धावपट्टी क्लीअर झाल्यावर विमान उतरवले. त्यामुळे धोका टळला. विमान उतरल्यानंतर मंत्री महाजन यांनी ट्रेनिंग सेंटरच्या विमानामुळे लेट झालो असे सांगितले. (Satara)

तर पायलट यांनी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांच्याकडे नाराजी व्यक्त करून व्हीआयपी दौऱ्यावेळी या विमानांची हालचाल बंद असायला हवी. ते विमान छोट्या इंजिनचे असते. त्यामुळे ते तातडीने बाजूला जात नाही असे सांगितले. त्यानंतर प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी तशा सूचना विमानतळ व्यवस्थापनाला दिल्या.

Girish Majahan News :
Vanchit Bahujan Aghadi News : काँग्रेसचे खासदार म्हणतात, आंबेडकरांकडून प्रस्ताव यायला हवा, प्रवक्त्याचा नको !

कऱ्हाड विमानतळावर व्हीआयपी दौऱ्यावेळी ट्रेनिंग सेंटरच्या विमानांच्या हालचाली झाल्या नाही पाहिजेत, असे मंत्री गिरीश महाजनांच्या विमानाच्या पायलटने सांगितले. तशा सूचना विमानतळ व्यवस्थापनाला दिल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.

तर मंत्री गिरीश महाजन यांच्या विमानाच्या पायलटने धावपट्टीवर ट्रेनिंग सेंटरचे विमान दिसत असल्याने त्यांचे विमान उशिराने धावपट्टीवर उतरवले. त्या विमानाच्या पायलटने धावपट्टीवर विमान दिसत असल्यामुळे विमान लगेच उतरण्याचा धोका पत्करला नाही. त्यामुळे मी व्हीआयपी दौरा असताना ट्रेनिंग स्कूलचे कोणतेही विमान धावपट्टीवर किंवा हवेत येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना ट्रेनिंग स्कूलच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यापूर्वीही तशा सूचना दिल्याचे विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी स्पष्ट सांगितलं.

Girish Majahan News :
Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी पूजेचा मान उपमुख्यमंत्री फडणवीस, की अजितदादांना ? मंदिर समितीचा 'हा' निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com