Satara ZP Mega Bharti : ठाकरे सरकारने अडवलेली नोकरभरती शिंदे-फडणवीस सरकारने केली खुली, झेडपीत ९७२ जणांना संधी

Zilla Parishad जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडली होती. कर्मचा‍ऱ्यांअभावी कामांचा निपटारा होण्यात अडचणी येत होत्या.
Satara Zilla Parishad
Satara Zilla Parishadsarkarnama
Published on
Updated on

Satara ZP Mega Bharti : महाविकास आघाडीच्या काळात अडवलेली जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीला शिंदे, फडणवीस सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांत आजपासून भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेतील तब्बल ९७२ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात पुणे, मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या युवकांना आता या भरतीच्या रुपाने जिल्ह्यातच नोकरीची संधी मिळणार आहे.

जिल्हा परिषदेतील Satara ZP विविध पदांची भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडली होती. कर्मचा‍ऱ्यांअभावी कामांचा निपटारा होण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने State Government सर्वच जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गांसाठी भरती होणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण २१ संवर्गांतील ९७२ पदांची भरती प्रक्रिया आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी दिली.

यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक एक, आरोग्य सेवक (पुरुष) ७६ जागा, आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी १७० जागा, आरोग्य सेवक (महिला) ३५३, औषध निर्माण अधिकारी ३५, कंत्राटी ग्रामसेवक १०१, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ग्रामीण पाणीपुरवठा) ३२, कनिष्ठ अभियंता (विद्युत) एक, कनिष्ठ आरेखक २.

Satara Zilla Parishad
Nagpur ZP News : राज्याचा पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवून केदार गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न !

तसेच कनिष्ठ लेखाधिकारी ४, कनिष्ठ सहायक (प्रशासन) ६९, कनिष्ठ सहायक (लेखा) ७, पर्यवेक्षिका ३, पशुधन पर्यवेक्षक ४२, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४, वरिष्ठ सहायक (प्रशासन) २, वरिष्ठ सहायक (लेखा) १०, विस्तार अधिकारी (कृषी) एक, विस्तार अधिकारी (शिक्षण) दोन, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पाच, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ५२ अशा रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्तींची माहिती जिल्हा परिषदेच्या www.zpsatara.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांनी मुदतीत https://ibpsonline.ibps.in/zpvpiun23/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.

Satara Zilla Parishad
Maharashtra Politics : 'दबाव गट' तयार करण्यासाठी घटक पक्षांची मोर्चेबांधणी सुरू ; राजू शेट्टींच्या पुढाकारात कोल्हापुरात..

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना एक हजार रुपये तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. यामध्ये माजी सैनिक व दिव्यांगांसाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे. उमेदवारांना अर्ज भरताना काही समस्या असल्यास या लिंकवर अथवा १८००२२२३६६, १८००१०३४५६६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. जिल्हास्तरावर सरळसेवा भरतीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, उमेदवारांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींबाबत ०२१६२ -२९५०५३ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डुडी व श्री. खिलारी यांनी केले आहे.

भरतीचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू - ५ ऑगस्ट

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत - २५ ऑगस्ट

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत - २५ ऑगस्ट

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख - परीक्षेच्या आधी सात दिवस

Satara Zilla Parishad
State Government Cabinet Meeting : शिंदे फडणवीस सरकारचा 'हा' मोठा निर्णय ! तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com