Guardian Minister : नागपूरचा पालकमंत्री कोण होणार? एकच नाव आघाडीवर....

Nagpur Political Updates : आगामी तीन महिन्यांत नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. नागपूर जिल्हा परिषदसुद्धा भाजपला पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायची आहे. याशिवाय नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेचीही जागा रिकामी झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडीत पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 23 December : अनेक जिल्ह्यांत पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. काही ठिकाणी भांडणेही होऊ लागली आहेत. याबाबतीत नागपूर जिल्हा सुदैवी म्हणावा लागले. नागपूरचा पालकमंत्री घोषित झाला नसला तरी तो जवळपास ठरला आहे. राज्याचे नवे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर फक्त मोहोर उमटवणे बाकी आहे.

नागपूर जिल्ह्यात दोनच कॅबिनेट मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचाच हक्क नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राहणार आहे. फडणवीस यापूर्वी पाच वर्षे मुख्यमंत्री असताना पालकमंत्री बावनकुळे हेच होते. तेव्हा त्यांच्याकडे ऊर्जा खाते होते.

आगामी तीन महिन्यांत नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदसुद्धा भाजपला पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायची आहे. याशिवाय बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची त्यांची जागा रिकामी झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडीत बावनकुळे आणि पालकमंत्री यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये वेगळा प्रयोग किंवा जिल्ह्याची अदलाबदली होण्याची शक्यता दिसत नाही.

Chandrashekhar Bawankule
Chhagan Bhujbal : फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला जाणार; अमित शाहांशी चर्चा करणार!

ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरसह भंडारा आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. विधानसभेची निवडणूकसुद्धा त्यांच्याच नेतृत्वात घेण्यात आली आहे. त्या निवडणुकीत भाजपसह महायुतीला बंपर यश मिळाले आहे. ते प्रदेशाध्यक्ष असतानाही पहिल्याच विस्तारात त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे महसूल खाते त्यांना देण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यातून आशिष जयस्वाल यांचाही मंत्रमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, ते शिवसेनेचे आहेत आणि राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचाही दावा संपुष्टात आला आहे. सध्या विदर्भात सर्वाधिक चूरस गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्याला मंत्रिपदच देण्यात आलेले नाही.

Chandrashekhar Bawankule
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादी आमदाराने स्पष्टच सांगितलं... 'राज्यात आता अडीच वर्षे संधी नाही!'

महायुतीच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री होते. गडचिरोली जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर आधीच दावा केला होता. मात्र त्यांना मंत्रिमंडळातच घेण्यात आलेले नाही.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com