Ram Kadam's Letter : शिवसेनेने भाजपच्या राम कदमांना अनुल्लेखाने मारले!

Uddhav Thackeray Nashik Tour : आमदार राम कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
Uddhav Thackeray-Ram Kadam
Uddhav Thackeray-Ram Kadam sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs BJP : भाजपचे आमदार राम कदम यांनी आज (ता. २१ जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिर दर्शनासंदर्भात पत्र ट्विट केले होते. त्याबाबत शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांनी कदम यांची अनुल्लेखाने उपेक्षा केली. (MLA Ram Kadam is not a leader to be noticed : Shiv Sena )

शिवसेनेच्या अधिवेशनासाठी शहरात विविध नेते दाखल झाले आहेत. त्यातील नेत्यांशी आमदार कदम यांनी केलेली टीका आणि ट्विट केलेले पत्र याबाबत विचारणा केली असता, बहुतांशी नेत्यांनी त्यावर बोलणे टाळले. आमदार कदम हे दखल घेण्याजोगे नाहीत. त्यांची चर्चा करून मोठेपणा देण्याची गरज नाही, असे या नेत्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray-Ram Kadam
Athawale On Maratha Reservation : आठवलेंनी सुचविला मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला; सरकार स्वीकारणार का?

याबाबत जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी आमदार राम कदम यांचे वस्त्रहरण करीत कदम यांनी आजवर किती पक्ष बदलले आहेत, त्यांची भाषा किती वेळा बदलली आहे, आज त्यांनी केलेल्या विधानावर ते सायंकाळपर्यंत कायम राहतील का? हा संशय आहे. अशा व्यक्तीला भारतीय जनता पक्षात कोणी किंमत देत नाही; म्हणून काहीतरी उद्योग करणे यापलीकडे या प्रकरणाला अर्थ नाही, असे सांगितले.

आमदार राम कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याविषयी विधान करणे हा एक विनोद आहे. आपली पात्रता न पाहता कदम अशी विधाने करीत असतात. दहिहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी त्यांनी केलेले विधान जनता विसरलेली नाही. कदम यांचा दृष्टिकोन आणि महिलांविषयीचे विचार समाजाला माहित आहेत, त्यामुळे कदम यांनी आधी आत्मपरीक्षण करावे आणि मग इतर नेत्यांविषयी बोलावे. उद्धव ठाकरे यांच्या विषयी विधान करण्याची त्यांची पात्रता निश्चितच नाही, असेही करंजकर म्हणाले.

Uddhav Thackeray-Ram Kadam
Sangli Loksabha : ‘विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा लढणार; यंदा कोणतीही कसर ठेवणार नाही’

शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन उद्यापासून नाशिक येथे होत आहे. या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सायंकाळी काळाराम मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत. गोदावरी आरती देखील करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना लक्ष्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. राजकारणाचा भाग म्हणूनच आमदार कदम यांनी हे पत्र ट्विट केले असावे, असे दिसते.

Edited By : Vijay Dudhale

Uddhav Thackeray-Ram Kadam
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : सोलापुरातूनही मराठा बांधव मुंबईकडे रवाना; 'MIM'चा पाठिंबा,मुस्लिम ब्रिगेड मोर्चात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com