Umesh Patil : आमदारकीची हौस लय भारी; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या गाडीवर आमदारकीचा लोगो असलेले स्टिकर!

MLA logo Sticker on Umesh Patil's Car : राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदारकीचा लोगो असलेले स्टिकर आढळून आले आहे. याबाबत कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Umesh Patil Car
Umesh Patil CarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 August : राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर ‘आमदार’ असे स्टीकर चिकटवलेले दिसून आले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांनाच हे स्टिकर आपल्या गाडीवर लावण्याची परवानगी असताना उमेश पाटील यांनी ‘आमदारकी’चे स्टिकर आपल्या गाडीवर कसे लावले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एरवी नियमबाह्य कामावर कडक भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या या नियमबाह्य वागण्यावर कोणती भूमिका घेतात, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले.

उमेश पाटील (Umesh Patil) हे सोमवारी (ता. 04 ऑगस्ट) दुपारी साडेचारच्या सुमारास पत्रकार परिषद घेण्यासाठी सोलापुरात आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद संपवून परत जात असताना त्यांच्या गाडीवर लावण्यात आलेले आमदारकीचा लोगो असलेले स्टिकर दिसून आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

आमदार (MLA) हे स्टिकर केवळ विधान परिषद आणि विधानसभा सदस्यांनाच लावण्याची परवानगी दिली जाते. महाराष्ट्रात कुठेही गेले तरी त्यांना टोल भरावा लागत नाही, टोलमधून आमदारांना सवलत देण्यात आलेली आहे. तसेच, इतरही सुविधा आमदारांना असतात. मात्र, आमदार असलेला लोगो अनाधिकृतपणे कोणी आपल्या वाहनांवर लावत असेल तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

Umesh Patil Car
'तू करमाळ्यात ये तुला दाखवतो', 'काय बघायचं ते बघ...'; शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ! शिंदेंचे शिलेदार हमरीतुमरीवर उतरले

उमेश पाटील यांच्या गाडीवर लावण्यात आलेले स्टीकर त्यांना नेमकं कसं मिळालं, हा प्रश्न आहे. पण, हल्ली बनावट स्टीकर तयार करून देणारी टोळी अनेक शहरात दिसून येते. उमेश पाटील यांची एमएच 04, एचडी 5565 क्रमांकाची गाडी सोमवारी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर उभी होती. त्या गाडीवर आमदार असा लोगो असलेले हिरव्या रंगाचे स्टिकर चिकटवण्यात आल्याचे दिसून आले.

Umesh Patil Car
konkan Politic's : भरत गोगावलेंच्या पालकमंत्रिपदासाठी आता उदय सामंत करणार मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई; स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनासाठी प्रयत्नशील

महाराष्ट्रात डमी आमदारांचे पेव फुटल्याचे दिसून येते. अनेकजण हौस म्हणूनही आमदारकीचा लोगो असलेले स्टीकर आपल्या गाडीवर लावून फुशारकी मारत फिरत असतात. पुणे जिल्ह्यात या डमी आमदारांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वर्षभरापूर्वी अशा डमी आमदारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आमदार म्हणून मिरवण्याची हौस काही लोकांची फिटत नसल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com