Sanjay Shinde : ...तर संजय शिंदे आज आमदार असते : सुनील तटकरेंनी सांगितली विधानसभा निवडणुकीतील ‘ती’ गोष्ट!

Sunil Tatkare Solapur Tour : माढ्यातही रणजितसिंह शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी, असे मी सांगत होतो. त्यांनी त्यावेळी ऐकले असते तर कदाचित आज वेगळे चित्र दिसले असते. आगामी काळात त्यांनी पक्षात सक्रीय व्हावे, असा सल्लाही तटकरेंनी संजय शिंदेंना दिला.
Sunil Tatkare-Sanjay Shinde
Sunil Tatkare-Sanjay ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 July : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सोलापूर दौऱ्यात अनेक घडामोडी घडल्या. शहराच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष हस्तक्षेप करतात, अशी तक्रार करण्यात आली, तर जिल्ह्याच्या मेळाव्यात तटकरेंनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलासंह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीस नाकार देणाऱ्या शिंदेंना कानपिचक्या दिल्या. संजय शिंदेंनी त्यावेळी ऐकले असते तर आज ते कदाचित आमदार असते, असे सांगून तटकरेंनी संजय शिंदेंना राष्ट्रवादीत सक्रीय होण्याचा सल्ला दिला आहे.

खासदार सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) प्रमुख उपस्थितीत सोलापुरात शहर आणि ग्रामीण असे दोन वेगवेगळे मेळावे झाले. शहराच्या मेळाव्यात अध्यक्ष संतोष पवार यांनी उमेश पाटील हे शहराच्या कामकाजात ढवळाढवळ करत असल्याची तक्रार तटकरेंकडे केली. त्यावर आगामी महापालिका निवडणुकीत शहरातील पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊनच तिकिटवाटप केले जाईल, तसेच तुमची जी खंत आहे, त्याची योग्य दखल मी घेतली आहे, असा शब्द तटकरेंनी पवारांना दिला.

ग्रामीणच्या मेळाव्यात मात्र तटकरेंनी विधानसभा निवडणुकीपासून पक्षात घडलेल्या अनेक घटनांवर भाष्य केले. विशेषतः माढा आणि करमाळा मतदारसंघातून शिंदे बंधूंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेण्यास नकार दिला होता. त्यावरून त्यांनी उपस्थित संजय शिंदेंना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घ्यावी, यासाठी मी अनेकदा विनंती केली. मात्र, करमाळ्यातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

माढ्यातही रणजितसिंह शिंदे यांना घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवा, यासाठी बबनराव शिंदे यांना विनंती करत होतो. मात्र, त्यांनीही निवडणुकीच्या काळात ऐकले नाहीत. हे दोघे विधानसभेला घड्याळाच्या चिन्हावर लढले असते, तर आज कदाचित हे दोघेही आमदार असते. आम्ही दोघांनाही विनंती करून थकलो. पण त्यांनी आमचे ऐकले नाही, अशी खंतही तटकरे यांनी बोलून दाखवली.

Sunil Tatkare-Sanjay Shinde
Suraj Chavan : माजी पोलिस पाटलांचा मुलगा...डावखरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीसोबत; पण एका घटनेमुळे सूरज चव्हाणांच्या राजकारणाला ‘ब्रेक’

विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून अपक्ष लढलेले संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी, यासाठी मी विनंती करून करून थकलो. माढ्यातही रणजितसिंह शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी, असे मी सांगत होतो. त्यांनी त्यावेळी ऐकले असते तर कदाचित आज वेगळे चित्र दिसले असते. आगामी काळात त्यांनी पक्षात सक्रीय व्हावे, असा सल्लाही तटकरेंनी संजय शिंदेंना दिला.

Sunil Tatkare-Sanjay Shinde
Sunil Tatkare Solapur Tour : सुनील तटकरे जाहीर कार्यक्रमात असं काही बोलले की, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील खुर्ची सोडून जाऊ लागले...

कार्यकारिणीची यादी तयार करून मुंबईला या...

सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीची यादी तयार करून तुम्ही मुंबईला घेऊन या. मुंबईत आपण त्या यादीवर चर्चा करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सर्वसमावेशक जिल्हा कार्यकारिणी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com