Jayant Patil : सरकारकडून पैसे कसे आणायचे?, हे या जयंत पाटलाला माहिती आहे : जयंतरावांनी शड्डू ठोकला

Uran-Ishwarpur Nagar Parishad Election 2025 : जयंत पाटील यांनी उरण-ईश्वरपूरमधील दत्त टेकडी विकासासाठी ५ कोटी आणि पाणी योजनेसाठी १२४ कोटी रुपये आणल्याचे सांगत राज्य सरकारकडून निधी मिळवण्यात आपला अनुभव अधोरेखित केला.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. जयंत पाटील यांनी उरण-ईश्वरपूर शहरासाठी ५ कोटींचा दत्त टेकडी विकास निधी आणि १२४ कोटींची पाणीपुरवठा योजना आणल्याचा दावा करत विरोधकांवर निष्क्रियतेचे आरोप केले.

  2. पाणी योजनांचे बिघाड, वाढलेली कनेक्शने, परंतु नवीन पाणी योजना किंवा पंप न खरेदी करण्याबद्दल त्यांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले.

  3. आमदार सदाभाऊ खोत यांच्या टीकेला उत्तर देताना पाटील यांनी टाटा कंपनीकडून मिळवलेल्या निधीतून रुग्णालयाचे आधुनिकीकरण झाल्याचे पुराव्यासह सांगितले.

Sangli, 01 December : उरण-ईश्वरपूर शहरातील दत्त टेकडीच्या विकासासाठी मी पाच कोटी रुपये आणले, तेव्हा कुठे आपली सत्ता होती. शहरातील पाणी योजना दुरुस्त करण्यासाठी मी १२४ कोटी रुपयांची योजना आणली आहे. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून पैसे कसे आणायचे, हे ह्या जयंत पाटलाला माहिती आहे, तुम्ही काहीही चिंता करू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले.

उरण-ईश्वरपूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जयंत पाटील (Jayant Patil) यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांना टोमणे मारत सत्ता नसतानाही आपण सरकारकडून निधी आणू शकतो, हे दाखवून दिले.

ते म्हणाले, उरण-ईश्वरपूर (Uran-Ishwarpur) शहरासाठी विकासाचा कार्यक्रम काय आहे, हे सांगण्यापेक्षा गल्लीबोळात फिरून माझ्यावर टीका करणे, हा काहींचा महत्वाचा कार्यक्रम झालेला आहे. आपण या शहरासाठी अनेक योजना सुरू केल्या. दुसऱ्या मजल्यावर चढणारं पाणी, त्या पाण्याची योजना बिघडवली. त्या योजनेतून २५ ते ३० टक्के लिकेज व्हायला लागले.

या शहरात गेल्या नऊ वर्षांत जेवढी पाण्याची कनेक्शन होती, ती कनेक्शन दुप्पट झाली. तरी त्यांना भान नव्हतं की नवीन योजना आणली पाहिजे आणि शहराला पाणी दिलं पाहिजे. गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी जी पाण्याची योजना होती, त्यानंतर आमची येथील सत्ता गेल्यानंतर पाणी पुरवठा योजना सक्षम झाली नाही. पण २०१६ नंतर पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी एक पंपही खरेदी केलेला नाही. त्यांनी सगळ्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

ते म्हणाले, मागच्या वर्षे-दीड वर्षापूर्वी सीईओला सांगून या शहराचा पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मी राज्य सरकारला पाठवला आहे. तो प्रस्ताव आता राज्य स्तरीय स्फुटणी कमिटीकडे गेला आहे. या पाणी योजनेसाठी १२४ कोटींची तत्वतः यापूर्वीच सरकारकडून देण्यात आलेली आहे. आता निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारने मान्यता दिलेल्या प्रस्तावाला, मान्यता आधीच दिलेली आहे. तो प्रस्ताव अजून मंत्र्यांकडे गेलेला नाही. आम्ही काय करू शकतो, याचा अंदाज म्हणून तुम्हाला एक प्रकरण सांगितले आहे.

Jayant Patil
Sanjay Raut illness : संजय राऊतांच्या आजारपणाचं अन् तुरुंगातील 101 दिवसाचं काय आहे कनेक्शन?

उरण-ईश्वरपूर शहरातील पाणी योजना दुरुस्त करण्यासाठी मी १२४ कोटी रुपयांची योजना आणली आहे. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात झालेली नाही. मी सीईओच्या मागे लावून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी बोलून मुख्य अभियंत्याशी बोलून ही योजना मुंबईला पाठवली. तो प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

समोर आले की सगळे चांगले वागतात

आमदार सदाभाऊ खोत यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी पुरावा देऊन उत्तर दिले. टाटा कंपनीकडून आठ कोटी रुपये आणले होते. त्यातून उरण ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिकरण करण्यात आले. त्याच्या उद्‌घाटन मी आमदार खोत यांनाही घेऊन गेलो होतो. आम्ही विरोधकांना सन्मान देतो. आम्ही त्यांना ताज्य समजत नाहीत. माझ्या समोर आले की सगळे चांगले वागतात. मागे काही का शिव्या देईनात, असा टोला जयंत पाटील यांनी खोतांना लगावला.

Jayant Patil
Angar election update : अनगर निवडणुकीबाबत मोठी अपडेट; राजन पाटलांना धक्का नाही, अधिकाऱ्यांनी सगळं क्लिअर केलं...

1. जयंत पाटील यांनी शहरासाठी किती निधी आणल्याचा दावा केला?

दत्त टेकडीसाठी ५ कोटी आणि पाणीपुरवठा योजनेसाठी १२४ कोटी.

2. पाण्याच्या समस्येबाबत त्यांनी कोणते आरोप केले?

वाढलेल्या कनेक्शननंतरही नवीन योजना न आणणे व २०१६ नंतर एकही पंप न खरेदी करणे.

3. पाणी योजना कोणत्या टप्प्यात आहे?

राज्यस्तरीय स्फुटणी समितीकडून मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली आहे.

4. आमदार खोत यांच्या टीकेला त्यांनी काय उत्तर दिले?

टाटा कंपनीकडून ८ कोटी आणून रुग्णालय आधुनिकीकरण केल्याचा पुरावा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com