BJP Vs Shivsena : भाजपने डाव अजूनही सोडलेला नाही : ऐनवेळी दगा देणाऱ्या शिंदेंविरोधात रवींद्र चव्हाण मोठ्या खेळीच्या तयारीत

KDMC Mayor Election Suspence : अनुसूचित जमातीसाठी आरक्षित महापौरपदामुळे सत्तासमीकरण बदलले असून, शिवसेना-मराठा संघर्षात भाजप छुप्या पाठिंब्याच्या डावाने मनसेच्या शीतल मंढारींना पुढे आणण्याच्या तयारीत आहे.
Political leaders during post-election negotiations as BJP, Shiv Sena and MNS weigh strategic options for the tribal-reserved mayor post in the municipal corporation.
Political leaders during post-election negotiations as BJP, Shiv Sena and MNS weigh strategic options for the tribal-reserved mayor post in the municipal corporation.Sarkarnama
Published on
Updated on

BJP vs Shivsena Mayor Election Politics : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणितांना वेग आला आहे. या प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेनेचे दोन शिलेदार शर्यतीत असले, तरी मनसेच्या शीतल मंढारी यांच्या रूपाने तिसरा पर्याय समोर आल्याने सत्तेचा सस्पेन्स वाढला आहे.

महापौरपदासाठी शिवसेनेकडे दोन प्रबळ दावेदार आहेत, मात्र दोघांचीही जमेची बाजू वेगळी आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली थवील यांच्याकडे पालिकेच्या प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. वडवली- अटाळी परिसरात 7 कोटींची विकासकामे आणि महासभेतील त्यांचा आक्रमक वावर यामुळे त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

तर कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले किरण भांगले यांनी पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला आहे. उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा असलेल्या किरण यांच्या रूपाने आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा, असा रवी पाटील यांचा प्रयत्न असेल. मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यामुळे सत्तेच्या वाटाघाटीत मनसेचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे.

दुसऱ्या बाजूला मनसेच्या शीतल मंढारी यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. पाठिंबा देताना मनसेने विकासासोबतच सत्तेतील पदांबाबतही काही 'बोलणी' केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेला खुश करण्यासाठी शीतल मंढारी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडू शकते.

Political leaders during post-election negotiations as BJP, Shiv Sena and MNS weigh strategic options for the tribal-reserved mayor post in the municipal corporation.
KDMC Mayor Politics: निकालानंतर आठच दिवसांतच मनसेचा उद्धव ठाकरेंना गुलिगत धोका; एका रात्रीत शिंदेंना पाठिंबा? राज ठाकरेंच्या नेत्यानं सांगितलं कारण

भाजपची 'छुप्या पाठिंब्याची खेळी?

शिवसेनेच्या खेळीमुळे महापौरपद भाजपच्या हातातून जवळपास निसटले आहे. शिंदेंच्या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप आता वेगळ्या रणनीतीवर विचार करत आहे. शिवसेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजप शीतल मंढारी यांच्या नावाचा आग्रह धरू शकते. भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा शीतल मंढारी यांना मिळाल्यास त्या महापौरपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे येऊ शकतात.

Political leaders during post-election negotiations as BJP, Shiv Sena and MNS weigh strategic options for the tribal-reserved mayor post in the municipal corporation.
KDMC Mayor : पहिला महापौर करण्याची संधी मनसेने गमावली! 'ती' एक चूक महागात पडली!

निवडणुकीपूर्वी शीतल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण उमेदवारीत डावलल्याने त्यांनी ऐनवेळी मनसेकडून निवडणूक लढवली. पण विजयानंतरही त्यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेतली होती. थोडक्यात मनसेचे संख्याबळ अगदी एका आकड्यात असलेल्या मनसेला महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com