NCP MP Tours News : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. पण, गेल्या चार वर्षांत मतदारसंघात न फिरकल्याने सोशल माडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रलंबित प्रश्नाचा भडीमार करण्यात आला. सोशल मीडियावर प्रश्न विचारणारे माजी सरपंच रामदास भोकटे यांची पोलिसांनी उचलबांगडी करत ठाण्यात डांबून ठेवले. त्यामुळे कोल्हेंचा पहिलाच दौरा प्रचंड गाजला. (Former sarpanch who questioned MP Amol Kolhe was detained by the police)
अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी शिरूर (Shirur) मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. आज ते आंबेगावच्या (Ambegaonnews) आदिवासी भागाच्या दौऱ्यावर होते. तसा दौरा त्यांनी जाहीर केला हेाता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून मतदारसंघात फिरकले नसल्यामुळे आदिवासी भागातील आसणे गावचे माजी सरपंच रामदास भोकटे यांनी एक ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपवर आदिवासींचे प्रलंबित प्रश्न टाकून ते कोल्हे यांना विचारू. त्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यावेत आणि त्यानंतरच गावात पाय टाकवा; अन्यथा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, असे भोकटे यांनी म्हटले होते.
तो ग्रुप पाहून पोलिसांनी माजी सरपंच भोकटे यांची घरातून उचलबांगडी केली. त्यांना पोलिस ठाण्यात चार तास बसवून ठेवण्यात आले. त्यामुळे आदिवासी भागातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोल्हे यांच्या तब्बल चार वर्षांच्या दर्शनानंतर आदिवासींमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
माजी सरपंच भोकटे यांनी उपस्थित केलेले प्रश्न (खासदार कोल्हेंनी आमच्या गावात येण्याआधी काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत)
१) कोरेाना काळात मदतीची गरज असताना खासदार साहेब कोठे होते
२) हिरडा नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही, त्यावेळी आपलं सरकारं होतं.
३) हिरड्याला हमीभाव द्यायचे काय झाले
४) आदिवासी भागात धरण असताना अजूनही आमच्या आदिवासी भगिनी डोक्यावरून पाणी वाहतात
५) घोडीवर बसून दिल्लीतून किती निधी आदिवासी भागासाठी आणला
या प्रश्नांची उत्तरे खासदार महोद्यांनी द्यावीत आणि त्यानंतर गावात पाय टाकवा अन्यथा आम्ही खासदार कोल्हेंचा निषेध करतो, असेही भोकटे यांनी म्हटलेले आहे.
आदिवासींवर अन्याय का करता : आढळराव
साडेचार वर्षांमध्ये तुम्ही फिरकले नाही, हे विचारले म्हणून पोलिसांनी घरी जाऊन रामदास भोकटे या माजी सरपंचाला घरातून उचलून आणून घोडेगाव पोलिस ठाण्यात चार तास बसवून ठेवले. कार्यकर्त्याला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले; म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील घोडेगाव पोलिस स्टेशनमध्ये गेले. तेथील अधिकाऱ्यांना ‘आदिवासींवर अन्याय का करता. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना ज्यांना आम्ही मतदान केले, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का. तसेच, मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदी यांच्यावर लोक वाईट वाईट कमेंट टाकतात, तरी त्यांच्यावर कारवाई का करत नाही,' असा सवालही विचारला.
दरम्यान, रामदास भोकटे यांच्याकडून तू लिहून दे की, मी यापुढे असं काहीही करणार नाही, असं बळजबरीने पोलिस लिहून घेत होते. शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पीएसआय चव्हाण व पीएसआय वागस आढळरावांसमोर कार्यकर्त्यांना व आदिवासी लोकांना अर्वाच्च भाषेत बोलत होते, असा आरोपही शिवसेनेकडून करण्यत आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.