Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा सोलापुरातही दरारा : महिनाभरात 36 लाखांसह 8 वाहने जप्त; 28 दुकाने सील, 35 एफआयआर दाखल

FDA Action In Solapur : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका महिन्याच्या कार्यकाळात धडक कारवाया झाल्या. सोलापूर जिल्ह्यात 35.77 लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
Tukaram Mundhe
Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 June : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होऊन आज एक महिना पूर्ण झाला. या एका महिन्यात दूध असो गुटखा सर्वच अन्न प्रशासनाच्या तावडीत सापडले आहे. आयुक्त मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे सोशल मीडिया असो की टपरी चालक या सर्वांमध्येच भीतीयुक्त दबदबा तयार झालेला आहे. या काळात सोलापूर जिल्ह्यात ३५ लाख ७७ हजार ५९७ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

सोलापूरच्या अन्न प्रशासनाने २५ मे ते २५ जून या कालावधीत एकूण ११८ अन्न नमुने घेतले आहेत. त्यामध्ये दूधाचे ४३ तर दुग्धजन्य पदार्थाचे ४७ नमुने आहेत. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु यासह राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्यांवर ३६ कारवाया करण्यात आल्या आहेत.

या कारवाईत ३५ लाख ७७ हजार ५९७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. विक्री करणारी २८ दुकाने सील करण्यात आली आहेत. या प्रकरणी तब्बल ३५ एफआयआर दाखल झाले असून ८ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Tukaram Mundhe
Pritam Munde : विलास घुले खून प्रकरणी प्रीतम मुंडे आक्रमक : थेट रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

इतर अन्नपदार्थांबाबतीत ११ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये सुपारी आणि गुळाचा प्रमुख समावेश असलेला व इतर अन्न पदार्थांचा तब्बल एक लाख ४८ हजार १७७ किलो साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची किंमत ३ कोटी ९५ लाख २३ हजार ४७४ रुपये एवढी आहे.

Tukaram Mundhe
Raju Khare Announcement : राजू खरेंची घोषणा वादात अडकणार?; भास्कररावांनी गोऱ्हेंच्या 'त्या' घोषणेची आठवण करून डिवचले, सुधीरभाऊंकडूनही पाठराखण!

सोलापूरच्या अन्न प्रशासन विभागाचे साहेबराव देसाई म्हणाले, सोलापूरकडे ९ अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत. आयुक्तपदी मुंढे रुजू झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीवर आम्ही युध्द पातळीवर, तत्काळ कार्यवाही करत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com