FDA Action : सांगलीतील ओढ्याला दुधाचा पूर, भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा धसका

Tukaram Mundhe FDA Sangli : टाकळी येथे शुक्रवारी सकाळी ओढ्याच्या पाण्याला अचानक दुधाचा पांढराशुभ्र रंग आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अनोळखी व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात दूध ओढ्याच्या पात्रात ओतल्याचे निदर्शनास आले
Tukaram Mundhe
Tukaram Mundhesarkarnama
Published on
Updated on

Sangli News : अन्न आणि औषध विभागात आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर महिनाभरात व्यवस्था रुळावर आली आहे. राज्यात अन्य आणि औषध प्रशासनाची सुरू असलेली मोहीम आणि तुकाराम मुंढेंची धास्ती भेसळखोरांनी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील भेसळखोरांनी थेट भेसळयुक्त दूध ओढ्यात ओतले आहे. मिरज तालुक्यातील टाकळी येथे भेसळखोरांनी दूध ओढ्यात ओतून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

टाकळी येथे शुक्रवारी सकाळी ओढ्याच्या पाण्याला अचानक दुधाचा पांढराशुभ्र रंग आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अनोळखी व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात दूध ओढ्याच्या पात्रात ओतल्याचे निदर्शनास आले असून, हे दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयातून कारवाई टाळण्यासाठीच नष्ट करण्यात आले असावे, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच मिरज तालुक्यातील सलगरे येथे दूध भेसळप्रकरणी दोघांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. या कारवाईनंतरच टाकळी येथे मोठ्या प्रमाणात दूध ओढ्यात टाकण्यात आल्याने या दोन्ही घटनांचा संबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. छाप्याची भीती निर्माण झाल्याने संबंधितांनी भेसळयुक्त दूध बाजारात विक्रीस न आणता ओढ्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा.

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या रडारवर सिया गोयलच्या वडिलांचं दुकान; एका दिवसांत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत मारले सील

यामुळे काही अंतरापर्यंत संपूर्ण ओढ्याचे पाणी दुधामुळे पांढरे झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या प्रकारामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. या प्रकरणाची चौकशी करून ओढ्यात टाकण्यात आलेल्या दुधाचे नमुने तपासावेत, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढेंच्या FDAची धडक कारवाई, एकाचवेळी सहा जिल्ह्यांत छापेमारी, 13 जणांना अटक; दूध भेसळ माफियांचे धाबे दणाणल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com