Nana Patole : लोकसभेच्या निकालानंतर नाना पटोलेंची दिल्लीत 'कॉलर' टाईट होणार?

Lok Sabha Election Result 2024 : राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले, तर प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोलेंचे दिल्लीत पुन्हा राजकीय वजन वाढणार आहे, त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य घडविणारी ही निवडणूक ठरणार आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Pimpri, 03 June : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. 4 जून) होणार असून त्यातून अनेकांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. भाजप आणि मोदींचा करिष्मा कायम राहतो का हे या निवडणुकीतून दिसणार आहे. तसेच, कॉंग्रेसलाही ऊर्जितावस्था आणून देणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले तर प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोलेंचे (Nana Patole) दिल्लीत पुन्हा राजकीय वजन वाढणार आहे, त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य घडविणारी ही निवडणूक ठरणार आहे.

देशाचे समीकरण महाराष्ट्रालाही लागू पडते आहे. कारण राज्याचा विचार केला तर येथे सत्तेत असलेल्या भाजपला चार महिन्यांनंतर होऊ घातलेली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लोकसभेच्या विजयातून बूस्टर डोस मिळणार आहे. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीलाही (Mahavikas Aghadi) पुन्हा राज्यात सत्तेत येण्यासाठी या निवडणुकीतील यश उपयोगी पडणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात म्हणजे केंद्रात कित्येक वर्षे निरंकुश सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेसची (Congress) महाराष्ट्रात फक्त एक जागा गेल्या वेळी लोकसभेला निवडून आली होती. त्यामुळे त्यांना 2024 च्या लोकसभेत लक्षणीय यश मिळाले, तर ते त्यांच्या दृष्टीने मोठे टॉनिक असणार आहे.

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कॉंग्रेसला पाच ते आठ जागा म्हणजे गेल्या वेळपेक्षा आठपट यश मिळेल, असा अंदाज आहे. तो खरा ठरला, तर त्यातून या पक्षाचे राज्यातील प्रमुख म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कॉलर टाईट होणार आहे. त्यांचे दिल्लीत वजन वाढणार आहे.

उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सीएम होण्यासाठी ही निवडणूक जशी महत्वाची आहे, तशीच ती पटोलेंच्याही दृष्टीने तेवढीच मोलाची आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या नजरेस ते भरणार तर आहेच, पण राज्यात आघाडीमध्येही त्यांचे वजन वाढणार आहे. ते आगामी विधानसभा निवडणुकीत जागांच्या वाटाघाटीसाठी उपयोगी पडणार आहे.

Nana Patole
Lok Sabha Exit Poll 2024 : अंदाज ठरणार फेल, मुस्लिम मतांची साथ कोणाला? एक्झिट पोलमध्ये काय?

काहीशा नेमस्त कॉंग्रेसला पटोलेंनी आपल्या कार्यकाळात आपल्या स्वभावानुसार आक्रमक केले. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होईल, असा अंदाज आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखे दिग्गज नेते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेल्यानंतरही पटोलेंनी जर पक्षाला लोकसभेला गेल्या वेळपेक्षा काहीपट जास्त यश मिळवून दिले, तर त्यांची वाहवा नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचा राज्यात फक्त एक खासदार हा विदर्भातून होता. ते म्हणजे चंद्रपूरचे बाळू धानोरकर. आता त्या जागेसह विदर्भातच नाही, तर राज्याच्या इतर भागातही त्यांच्या जागा वाढणार आहेत, असे एक्झिट पोल सांगत आहे.

परिणामी राज्यातच नाही, तर देशातही कॉंग्रेसची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. पुन्हा गतवैभवाकडे जाण्याची वाट या पक्षाला सापडणार आहे. देशात सत्तेत येण्यासाठी उत्तर प्रदेशानंतर जसा महाराष्ट्राचा वाटा असतो, तसाच तो कॉंग्रेसलाही उभारी देण्यास राज्य उचलणार की कसे, हे या लोकसभेचा निकाल ठरविणार आहे.

Nana Patole
Jayant Patil : मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना जयंत पाटलांनी व्यक्त केली 'ही' भीती; ‘चंदीगडप्रमाणे...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com