Shirur Lok Sabha Election 2024 : शिरुरच्या पीडीसीसी बँकेबाहेर पोलिस बंदोबस्त...; कोल्हेंची आयोगाकडे मागणी!

Lok Sabha Election 2024 : ...म्हणूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांशी संबंधित भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अनेक शाखा आहेत.
Shirur Lok Sabha Election 2024
Shirur Lok Sabha Election 2024Sarkanama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकासाठी आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीचं वातावरण पेटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर मतदारसंघात तळ ठोकून आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवारही शिरुरच्या मैदानात खासदार अमोल कोल्हेंसाठी जोरदार रणनीती आखली आखली. दरम्यान बारामतीच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासंदर्भात आता शिरुरमध्ये खबरदारी म्हणून पतसंस्थेबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात यावे, अशी मागणी कोल्हेंनी केली आहे.

Shirur Lok Sabha Election 2024
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमोल कोल्हे यांनी निवडणूक काळात आणि मतदानाच्या दिवशी होणारा संभाव्य गैरप्रकार थांबावा यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. शिरूर लोकसभेच्या हद्दीतील पीडीसीसी बँक आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांशी संबंधित असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावावा, अशी मागणी मविआ उमेदवार अमोल कोल्हेनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Shirur Lok Sabha Election 2024
BJP News: भाजपने राऊतांना भरला दम; आपले 'प्रताप' बंद करा, अन्यथा तुमची शुर्पणखा करु...
Shirur Lok Sabha Election 2024
BJP News: भाजपने राऊतांना भरला दम; आपले 'प्रताप' बंद करा, अन्यथा तुमची शुर्पणखा करु...

बारामती लोकसभेच्या (Lok Sabha) मतदानाच्या आदल्या रात्री पीडिसीसी बँक सुरू होती. या बँकेत पैसे वाटप झाला, असा आरोप विरोधकांनी केला होता. म्हणूनच या बँकेने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला. पैसे वाटप होण्याची ही शक्यता शिरूर लोकसभेत ही आहे. म्हणूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांशी संबंधित भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अनेक शाखा आहेत. तिथून हा पैसा वाटप होईल, ही भीती कोल्हेना आहे. म्हणूनच त्यांनी या बँका आणि पतसंस्थांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Shirur Lok Sabha Election 2024
Sushama Andhare News : ठाकरे गटाची मोठी खेळी; करंजकर यांच्या दारात सुषमा अंधारे धडाडणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com