Uday Samant : भर स्टेजवर उदय सामंत यांची मिश्किली टोला; म्हणाले, 'मी जयंत साहेबांच्या तालमीत तयार झालोय'

BJP Leader Chandrakant Patil & Jayant Patil : दोन दिवसांपूर्वी सांगलीत हळद संशोधनाचे उपकेंद्र सुरू करू अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. याच पश्चिम महाराष्ट्र उद्योग, व्‍यापार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant On Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : दोन दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र उद्योग, व्‍यापार परिषदेत राज्याचे तिन दिग्गज नेते एकत्र आले होते. यातील दोन सत्तेत असणारे तर एक विरोधी बाकावर बसणारे असल्याने जिल्ह्यात अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी मंत्री जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्याने विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच आता उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्याच समोर भर स्टेजवर, 'मी जयंतरावांच्या तालमीत तयार झालोय' असे वक्तव्य केल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. तर यावेळी चंद्रकांत पाटलांनी देखील यावर काहीतरी वक्तव्य केल्याने कार्यक्रमात हशा पिकला होता.

सांगलीत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (मसिआ) तर्फे पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषद आणि यलो सिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जयंत पाटील याच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मसिआचे अध्यक्ष ललित गांधी देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात सांगलीतील एमआयडीसीचा विषय निघाला. जयंत पाटील यांनी उद्योग मंत्र्यांकडे एमआयडीसीकडे जरा लक्ष द्या अशी मागणी केली. याचाच धागा पकडत सामंत यांनी चंद्रकांत पाटलांच्या समोर मिश्किली टोलेबाजी केली.

Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : काँग्रेसच्या बड्या नेत्याला शिंदेंच्या शिलेदाराचा टोला; म्हणाले, "तुमच्या पक्षात काय सुरू आहे ते आधी बघा..."

सामंत यांनी, जयंत पाटील यांनी मागणी केली आहे. पण मी देखील जयंत पाटील साहेबांच्या तालमीत तयार झालो आहे. त्यामुळे एकदा शब्द दिला तर तो तडीस नेला जातो. असे म्हटले होते. याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी कोणाच्या तालमीत असा सवाल करताच उदय सामंत यांनी गुगली टाकत पूर्वी मी जयंत पाटील साहेबांच्या तालमीत तयार झालो. आता तुमच्या तालमीत तयार होतोय असे सांगितले. यावरून कार्यक्रम एकदम हलका फुलका झाला.

Uday Samant On Jayant Patil
Uday Samant Vs Sanjay Raut : 'राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री संजय राऊत होणार...', एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितले

याच कार्यक्रमात जयंत पाटील यांनी, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे, अमेरिकेच्या ट्रंप धोरणांमुळे तिकडे जगभरातील उद्योजक पाठ फिरवू शकतात. तेव्हा त्यांच्या स्वागताची आपण तयारी ठेवावी असा चिमटा उद्योग मंत्री सामंत यांचा काढला. तसेच ‘दावोस’मधील गुंतवणूक करारातील एखादा लिफाफा सांगलीसाठी उघडावा, असे आवाहान केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com