

Solapur, 10 October : भारताची नाचक्की पंतप्रधानांनी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यसपीठावर कपाळावर नाणे लावून पाडणे असो किंवा टेलिप्रिंटरवर चुकीची माहिती देणे असो यामुळे भारताची आंतराराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन झाली आहे. भारताची प्रतिमा 70 वर्षांपूर्वी जादूटोणा करणारे, साप पाळणारे अशी होती, तीच प्रतिमा भाजप आणि नरेंद्र मोदींनी करून ठेवली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.
ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुरू आहे. पुणे मतदार संघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आम्ही लढवतोय. त्यांच्या प्रचारार्थ आम्ही सोलापूर आणि सांगलीमध्ये सभा घेतोय.भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतदेखील असंच पाहायला मिळालं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उधळपट्टीवर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, झेन झी (zen g) भाजपविरोधात गेली आहे, त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी कार्यक्रम घेतात. बरेच gen g ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, हे विसरले आहेत. त्यांनी आता कितीही खटाटोप केला तरी gen g सोबत येणार नाही, त्यामुळे हे सगळं थांबवा आणि शेतकऱ्यांकडे निधी वळवा.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत या दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अमरावतीमधील वंचितचा फॉर्म हा तांत्रिक कारणामुळे नामंजूर झाला आहे. आम्ही तपास करत आहोत आणि त्यानंतरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. कोणत्याही पद्धतीने फॉर्म राखता आला तर आम्ही त्यासाठी प्रयत्न करू, असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये ज्या अजेंड्यावर लढली होती, तो अजेंडा आम्ही अजूनही बदलला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांच्या MPSC आंदोलनावरही आंबेडकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले मुद्द्यावर बोलायला पाहिजे आणि त्याच मुद्द्यावर मी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रोहित पवार यांच्यासोबत असे 7 विद्यार्थी आहेत, जे कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीत. हे आंदोलन गाजत आहे. मात्र, त्या 7 विद्यार्थ्यांची नावे आपणाला आजही माहिती नाहीत. रोहित पवार यांच्या भोवती आंदोलन सुरु असल्याने विद्यार्थ्यांच्या मुख्य मागणीकडे लक्ष जातं नाही आणि हीच धोक्याची घंटा आहे.
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगून सुजात आंबेडकर यांनी आजपर्यंत कोणतेही आंदोलन बघितलं, तर भाजपने ते आंदोलन चिरडून टाकण्याचाच प्रयत्न केला आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन झाले, तेव्हा कोविडची भीती दाखवून ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला.
महाराष्ट्रात कोरेगाव भीमा येथे आंदोलन झालं, तेंव्हा जिल्ह्याजिल्ह्यांत कोम्बिंग ऑपेरेशन घडवून ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा जन आंदोलन भाजप विरोधात जाते, तेव्हा पोलिस आणि प्रशासन यांना चुकीच्या पद्धतीने वापरून ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या जावयला शेती महामंडळाची 1200 एकर जमीन देण्याच्या निर्णयावर आंबेडकर म्हणाले, ही जमीन पवारांच्या सांगण्यावरून दिली की संघाच्या सांगण्यावरून दिली हा तपासाचा भाग आहे.
मुंबई महापालिकेची अनेक कामं थकीत आहेत. PR ऍक्टिव्हिटीसाठी 25 लाख खर्च करत आहेत, याचं ऑडिट झालं पाहिजे. भाजपच्या नियंत्रणात अगोदर सोशल मीडिया होता, तेच आता त्यांच्या विरोधात जातं आहे;म्हणून आशा ऍक्टिव्हिटी रबावल्या जात आहेत. त्यांनी PR ला 25 लाख खर्च करण्यापेक्षा काम चांगलं करावं, त्या निवडून येतील.
गॅलगोटीयासारख्या विद्यापीठात चीनने बनवलेला रोबोट आम्ही बनवला असं सांगितलं गेलं. दुसऱ्याच दिवशी चीनने त्याच पेटंट दाखवलं, अशा पद्धतीने भारताची हटाई झाली. असं ठिकठिकाणी नरेंद्र मोदी देशाची गरिमा खाली आणत असून भारतात पनौती म्हणून राहतात. अशात भारतीय कंपन्यांना आमंत्रण दिले नाही, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.70 वर्षांपूर्वी भारताची प्रतिमा जादूटोणा करणारे, साप पाळणारे अशी होती, तीच प्रतिमा भाजप आणि नरेंद्र मोदीने करून ठेवली आहे.
विप्रोचं फंडिंग थांबवलं गेलं आहे, TCS लव्ह जिहादमध्ये अडकवली गेली आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना ग्लोबल ऍक्सेप्टन्स मिळणे कठीण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.