उदयनराजेंना अनेक गोष्टींची परतफेड करावी लागेल...क्लाईड क्रास्टो

खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje Bhosale यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे NCP प्रवक्ते क्लाईड क्रास्टो Clyde Crasto यांनी ट्विटरवरून Twitter प्रतिउत्तर दिले आहे.
Clyde Crasto, Udayanraje Bhosale
Clyde Crasto, Udayanraje Bhosalesarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आतापासूनच दुःख आणि वाईट वाटते. कारण, त्याना त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टींची परतफेड करावी लागणार आहे, असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी दिले आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्यावतीने स्टार प्रचारक म्हणून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रॅली काढून वातावरण निर्मिती केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली.

Clyde Crasto, Udayanraje Bhosale
Silver Oak Attack : या जन्माच इथेच फेडावं लागतं : छत्रपती उदयनराजेंकडून हल्ल्याचे समर्थन

तसेच राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाविषयी उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर.'' अशी तिखट प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून व्यक्त केली होती.

Clyde Crasto, Udayanraje Bhosale
हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया : म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण..."

या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विटरवरून प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, मला उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आतापासूनच दुःख आणि वाईट वाटत आहे. कारण, त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टींची परतफेड करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav thackeray, eknath shinde, jaykumar gore
Devendra Fadnavis Hasan Mushrif .jpg
Gopichand Padalkar–Jayant Patil political rivalry
Ranjitsinh Shinde vs Abhijit Patil | Solapur Milk Union Row
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com