Radhanagari, Shahuwadi Constituency : उद्धव ठाकरेंनी राधानगरीतून आयता उमेदवार शोधला, तर शाहुवाडीतून सरूडकरांना संधी!

Uddhav Thackeray and Satyajit Patil Sarudkar News : आता पुन्हा एकदा विनय कोरे आणि सत्यजित पाटील सरूडकर यांचा या विधानसभा निवडणुकीत सामना होणार आहे.
Uddhav Thackeray and Satyajit Patil Sarudkar
Uddhav Thackeray and Satyajit Patil SarudkarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT and Kolhapur Vidhan sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज(बुधवार) पहिली यादी जाहीर केली. या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतून महाविकास आघाडीकडे गेलेले माजी आमदार के पी पाटील यांना संधी देण्यात आले आहे. तर शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना संधी देण्यात आली आहे.

पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून 2014 ला सत्यजित पाटील सरूडकर यांनी जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे(Vinay Kore) यांचा पराभव करून विधानसभेत एन्ट्री केली होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा विनय कोरे आणि सत्यजित पाटील सरूडकर यांचा या विधानसभा निवडणुकीत सामना होणार आहे.

Uddhav Thackeray and Satyajit Patil Sarudkar
MNS Candidate Third list : 'मनसे'ची तिसरी यादी जाहीर; भाजपमधून आलेल्या नेत्यालाही दिली उमेदवारी!

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील सरूडकर यांना महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंना संधी दिली होती. मात्र खासदार धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा सत्यजित पाटील सरूडकर यांच्यावर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर भरोसा ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्याचे पाहताच माजी आमदार के पी पाटील हे महाविकास आघाडीकडे आकर्षित झाले. ही जागा शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार याबाबतची कल्पना मिळाल्यानंतर त्यांनी दोन वेळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. एकाच महिन्यात घड्याळ तुतारी असा प्रवास करत त्यांनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे आता या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून असणारे आमदार प्रकाश अबिटकर विरुद्ध माजी आमदार के पी पाटील असा सामना रंगणार आहे.

Uddhav Thackeray and Satyajit Patil Sarudkar
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरेंचा मोठा डाव!; आनंद दिघेंच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला होता. विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसला निश्चित झाल्याची माहिती आहे. शिवाय आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाा दावा आहे. पहिल्या यादीत उद्धव ठाकरे यांच्याकडून कोल्हापूर उत्तरच्या जागेबाबत निर्णय झाला नसल्याने जवळपास ही जागा काँग्रेसला सुटली असल्याचं निश्चित झाले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com