Uddhav Thackeray News : भाजप, गद्दारांचं तण उखडून फेकून द्या; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Political News : शिवसेनेने मंत्री केले, त्यावेळी शिवसेनेत आणि गद्दारांबरोबर जाऊन तिकडे गद्दारी करून तिकडे मंत्री होणार. म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री अशी स्थिती लुटमार मंत्र्यांची झाली आहे, अशी टीका पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर केली
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस पक्षासोबत गेल्यामुळे आम्ही गद्दारी केली, असे मिंधे गट सांगत आहे. पाटणचे लुटमार मंत्री त्यामध्ये पुढे होते. त्यांचे आजोबा काँग्रेसमध्येच मंत्री होते. बाळासाहेब देसाई व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते म्हणून आम्ही त्यांना शिवसेनेत घेतले. आपण त्याना मंत्री केले. मात्र, महाराष्ट्रात जी गद्दारी झाली त्यामध्ये हाच लांडगा पुढे होता, असे मिंधेंनी सांगितले. शिवसेना म्हणजे काय गांडूळांची अवलाद आहे का ? जिथे जिथे भाजप आणि मिंध्यांचे उमेदवार असतील, ते तण उखडून गुजरात, गुवाहाटीला तडीपार करा, फेकून द्या, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मल्हारपेठ येथील सभेत केले.

पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते. आमदार मिलिंद नार्वेकर, युवा नेते जयेश ठाकरे, शिवसेनेचे (Shivsena) उपनेते नितिन बानुगडे पाटील, माजी आमदार सदाशिव सकपाळ, सातारा-जावळीचे उमेदवार अमित कदम, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Priyanka Gandhi VIDEO : भाजपचा झेंडा फडकावणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रियांका गांधींनी डिवचलं; रोड शोमध्ये जोरदार राडा

शिवसेनेने मंत्री केले, त्यावेळी शिवसेनेत आणि गद्दारांबरोबर जाऊन तिकडे गद्दारी करून तिकडे मंत्री होणार. म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री अशी स्थिती लुटमार मंत्र्यांची झाली आहे, अशी टीका पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर केली. त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता आणि मी त्यांना ती लुटून देत नव्हतो. म्हणून आमचे सरकार पाडले. एका सभेत अमित शहा बोलले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. त्यामुळे मिंदे यांचा आता उपयोग संपला आहे. त्याना आता कोण विचारणार नाही ? भाजपचे वापरा आणि फेकून द्या, अशी संस्कृती असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यावेळी केला.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा; शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

शिवसैनिक एकदा भीडला की काय करतोय हे या निवडणुकीत कळेल. राज्यात अनेक विकास कामांचे टेंडर निघाले, पैसे खाल्ले गेले आणि कामे झाली नाहीत. त्यांना जाब विचारणारे कोणी नाही. आजपर्यंत शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी डोक्यावर घेतली होती, त्यांनी महाराष्ट्र लुटला. त्या लुटीचे पैसे आता वापरुन पुढे लूट करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. हर्षद कदम हा निवडणुकीला उभा असला तरी तो एकटा नाही मी त्याच्याबरोबर आहे. हर्षद जिंकला तर महाराष्ट्र जिंकणार आहे आणि तो हरला तर महाराष्ट्र हरणार आहे. महाराष्ट्र ओरबडायचे सुरू आहे. शिवसेनेची गद्दारी केली त्यांना सगळं दिले होते. लुटमार मंत्र्याला होम मिनिस्टर केले. त्यानी त्याचा वापर गद्दारांना पळून जाण्यासाठी केला. महाराष्ट्र आदानीच्या घशात घातला जात आहे. मुंबई आदानीच्या घशात घातली होती, ती मी काढली म्हणून समजा, असा आरोप त्यांनी केला.

Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Memorial Day : मोदींच्या चॅलेंजला राहुल गांधीचं उत्तर; बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून पंतप्रधानांना केलं निरुत्तर

शिवसेना प्रमुखांचा आज स्मृतीदिन आहे. काही जाहिराती गद्दारांनी केल्या आहेत. त्यात माझ्या वडिलांचा फोटो वापरण्यात आले आहेत. गद्दांनी माझ्या वडिलांचा फोटो सोडून त्यांच्या वडिलांचा फोटो लावावा, मग कसे जोडे खायला लागतील ते बघावे. त्या जाहीरातीत बाळासाहेबांचे एक वाक्य टाकले आहे मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मग बाळासाहेब शिवसेना भाजपची कमळाबाई होऊ दे, असे म्हटले होते का ? हर्षद कदम हा उमेदवार तुमच्या सुख दुःखासाठी, तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्या सोबत उभा आहे. हर्षद कदम हा एकटा नसून मी आणि माझा प्रत्येक शिवसैनिक त्याच्या सोबत आहे. त्याला या निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

Uddhav Thackeray
Balasaheb Thorat : 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप, त्याच नेत्याकडे तिजोरीच्या चाव्या; थोरातांचा भाजप अन् अजितदादांवर निशाणा

मुन्ना महाडीक यांना दिला इशारा

महाविकास आघाडीकडून महिलांना तीन हजार रुपये महिन्याला देणार आहोत, असे सांगून ठाकरे म्हणाले, लुटमार मंत्र्यासह गद्दांराच्या कुटुंबीयांच्या संरक्षणसाठी पोलिस लावले आहेत. महिलांना सुरक्षा देणे गरजेचे असून त्यांना आम्ही सुरक्षीतता देणार आहोत. कोल्हापूरचे मुन्ना महाडिक बेदरकारपणे महिलांना बोलले. त्यांनी जे महिला रॅलीला जातील त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा असे सांगितले. त्यांनी महिलांना नोकर समजले आहे काय ? प्रचार रॅलीसाठी आलेल्या एकाही महिलेच्या केसाला जरी धक्का लागला तरी मुन्ना तुझा हात उखडुन काढल्याशिवाय राहणार नाही, ही जाहीर धमकी समज. हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे, असाही इशारा त्यांनी दिला.

Uddhav Thackeray
Amol Kolhe : 'हो मी बारामतीत जाणार, दादांच्या विरोधात सभा घेणार'; कोल्हेंचा फडणवीसांवर देखील पटलवार

पाटणकरांवरही साधला निशाना

पाटणला जे दुसरे उमेदवार उभे आहेत त्यांची आपापसात देवघेव झाली असेल असे म्हणतात असे सांगून ठाकरे म्हणाले, तीन उमेदवारांपैकी एक मस्तीमध्ये वागणारा लुटमार करणारा आहे. तर दुसरे प्रतिस्पर्ध्याचा आव आणणारे, ज्यांना उठा उठा निवडणूक आली, लोकांकडे जायची वेळ आली असे म्हणावे लागते, असा उमेदवार आहेत. जो स्वाभिमानी महाविकास आघाडीत करून उभा आहे. त्याला पाडण्यासाठी अपक्षाचे बुजगावने उभे करून गद्दारी केली जात आहे. भगव्याचे आडवून हा पक्षाला मदत करतील, ते यापुढे गद्दारी म्हणून समजली जाई. हर्षद कदम हा उमेदवार तुमच्या सुख दुःखासाठी, तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्या सोबत उभा असणारा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : 'मनसे नव्हे गुनसे, मागच्यावेळी बिनशर्ट आता इनशर्ट...' उद्धव ठाकरेंनी 'मनसे'ला डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com