Amol Kolhe : 'हो मी बारामतीत जाणार, दादांच्या विरोधात सभा घेणार'; कोल्हेंचा फडणवीसांवर देखील पटलवार

MP Amol Kolhe Ajit Pawar Devendra Fadnavis Pune : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष किती ठिकाणी विजयी होणार, याचा आकडा अमोल कोल्हे यांनी सांगितला.
Amol Kolhe 1
Amol Kolhe 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले असता अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना आव्हान देत आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला होता. तसेच कोल्हे खासदार कसे होतो हे बघतोच, असं देखील आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं.

कोल्हेंचा पराभव करण्यासाठी दादांनी शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहीर सभा देखील घेतल्या होत्या. आता अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक रिंगणात असताना कोल्हे अजितदादांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

पुण्यामध्ये प्रचारार्थ आले असता अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी माध्यमांशी संवाद साधला. बारामतीमधील प्रचार दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी इतक्या निवडणुका झाल्या, परंतु काकी कधी बाहेर पडल्या नव्हत्या. मात्र आता काकींना नातवाचा इतका पुळका का आलाय? हे निवडणुकानंतर विचारणार असल्याचं अजित पवार यांनी विधान केलं होतं.

Amol Kolhe 1
Hadapsar Assembly Election 2024: मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय; हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड

कोल्हे म्हणाले, "मी काकींचे आभार मानेल, कारण महाराष्ट्र धर्माची ही निवडणूक आहे. आगामी काळात महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार याबाबतची ही निवडणूक आहे. केवळ ही विधानसभा निवडणूक नसून महाराष्ट्र 50 खोक्यात विकला जाणार का? महाराष्ट्र सेंट्रल एजन्सीच्या दबावाखाली वाकणार का? की स्वाभिमानासाठी लढणार ही हे दाखवण्याची ही निवडणूक असून त्यासाठी काकीनसारखी आदरणीय व्यक्ती बाहेर पडली असेल तर त्याचा आम्हाला आदर आहे".तसेच मी बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचाराला जाणारा असून उद्या मी बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारासाठी सभा घेणार आहे, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Amol Kolhe 1
Sambhajiraje Chhatrapati : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बंडखोरांना संभाजीराजेंकडून बळ; कोथरूड, शिवाजीनगरसाठी मोठा निर्णय

पराभवातून विष पेरलं जातंय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये येऊन एक व्हिडिओ क्लिप दाखवली होती. त्यामधून त्यांनी व्होट जिहाद सुरू असल्याचा आरोप केला होता. अमोल कोल्हे यावर म्हणाले, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पराभव दिसू लागल्याने त्यांना हे विष पेरलय आहे.पण 'बटेंगे तो कटेंगे' यासारखी विषारी बीजे पेरण्यासाठी ही गंगा, जमुनेची भुसभुशीत माती नसून हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे". ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन स्वराज निर्माण केला आहे. त्याचा कदाचित देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला असेल, अशी टीका देखील अमोल कोल्हे यांनी केली.

महायुतीला पराभव दिसू लागला

महायुतीतील अंतर्गत घडामोडीवर बोलताना कोल्हे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांची मी एक मुलाखत पाहिली, त्याच्यामध्ये अजित पवार यांच्याबाबत ते 'नया हे वह', असे म्हणाले. पराभव समोर दिसत असल्याने महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये या पराभवाच्या खापर नेमक कोणावर फोडायचं असा विचार सुरू आहे". या तिन्ही पक्षांना जोडणारा सत्ता ही गुल होते. मात्र सत्ताच जात असल्याचं दिसत असल्याने तिन्ही पक्षांची तोंड वेगवेगळे झाले आहे, असाही टोला अजित पवार यांनी लगावला.

महाविकास आघाडी किमान 165 जागा जिंकणार

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकेल, असं विचारलं असता कोल्हे म्हणाले, "आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किमान 165 जागा जिंकणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात 60 ते 65 जागा जिंकेल, कारण राज्यात शरद पवार यांची त्सुनामी दिसत आहे". सध्या महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार हे महत्त्वाचं असल्याचं देखील कोल्हे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com