Uddhav Thackeray, Amit Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Amit Thackeray, Raj ThackeraySarkarnaa

Uddhav Thackeray : 'मनसे नव्हे गुनसे, मागच्यावेळी बिनशर्ट आता इनशर्ट...' उद्धव ठाकरेंनी 'मनसे'ला डिवचलं

Thane Assembly Election 2024 : "महाराष्ट्र नवनिर्माण सेना' आता 'गुजरात नवनिर्माण सेना' झाली आहे", असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.
Published on

Thane News, 17 Nov : "महाराष्ट्र नवनिर्माण सेना' आता 'गुजरात नवनिर्माण सेना' झाली आहे", असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.

या सभेत बोलताना त्यांनी मनसे (MNS) आता गुनसे झाल्याची टीका करत काही लोक गुजरातला ढोकळा खायला गेले, असं म्हणत नाव न घेता त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, "गुजरातला हे लोक ढोकळा खायला गेले. ठाण्यातली मिसाळ खायची ना, काही लोकांना मिसळ खूप आवडते. त्यांनी मागच्यावेळी बिनशर्ट पाठिंबा दिला आणि आता इनशर्ट पाठींबा दिला आहे.

Uddhav Thackeray, Amit Thackeray, Raj Thackeray
Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा, आक्रमक कार्यकर्त्यांनी अंगावर खुर्च्या फेकल्याचा VIDEO व्हायरल

गुजरात नवनिर्माण सेना

मला विचारतात एक जागा का सोडली नाही? मी का सोडू जागा यांना लुटायला सोडायची का? कोणत्याही लुटणाऱ्या लोकांना मी जागा सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी माहीम विधानसभेची जागा का सोडली नाही यावर स्पष्ट भूमिका मांडली. तर या ठिकाणी तुम्ही आता दुसऱ्यांना मतं दिली तर आता आपलं काही खरं नाही. आपण गुनसेला मत देणार का? असा उपस्थितांना सवाल करत गुजरात नवनिर्माण सेना आता मनसे नाही राहिली, गुनसे झाली असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं.

Uddhav Thackeray, Amit Thackeray, Raj Thackeray
BJP Politics : 'परफेक्शनिस्ट' भाजप! 'ही' त्रिसूत्रीच ठरणार महायुतीसाठी प्लस पाॅईंट?

ठाणे गद्दारीचं केंद्रबिंदु

दरम्यान, ठाणे हे गद्दारीचं केंद्रबिंदु आहे, इथे मशाल लावली तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दार मुक्त होईल, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath shinde) टीका केली. ठाकरे म्हणाले, मी ठाण्यात आलोय कारण गद्दारीचा केंद्रबिंदु इथे आहे. गद्दाराच्या बुडाला मशाल लावायची आहे. ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com