Kolhapur News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत गटबाजीचे ग्रहण काल झालेल्या मेळाव्यानंतर बऱ्यापैकी संपुष्टात आले आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचा अपवाद वगळता बहुतांश नाराज पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली.
शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शिवसेना (Shivsena) अस्तित्वहीन झाल्याचे चित्र होते. पण या मेळाव्यामुळे मूळ शिवसैनिकांना ऊर्जा मिळाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेतील गटबाजी उघड झाली होती, उपनेते संजय पवार सहसंपर्कप्रमख विजय देवणे, समन्वयक हर्षल सुर्वे यांनी बंड पुकारले होते. सुर्वे यांनी तडफाडकी शिवसेना शिदे गटात प्रवेश केला. तर अन्य नाराज पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली मात्र यावर पक्षप्रमुख ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख निवडीचा निर्गय मी स्वतः घेतला आहे. त्यात बदल होऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले, यानंतर शिवसेनेतील सर्व हालचाली शांत झाल्या होत्या.
त्यानंतर रविवारी झालेल्या मेळाव्या दरम्यान प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत शिवसैनिक एकवटलेला दिसला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निष्ठावंत सैनिकांना बळ देणार हा मेळावा करण्याचा अंदाज आहे. यापूर्वी शिवसेना हा पक्ष इतर पक्षातील नेते चालवतात असा ठपका इतरांकडून होत आला आहे. त्यातच हा डाग पुसण्याची संधी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर आहे.
ज्या पद्धतीने कालच्या मेळाव्यात शिवसैनिक एकवटले होते. त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा एकोपा टिकून भगवा फडकवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. शिवसेनेच्या निर्मितीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात अंतर्गत गटबाजी दिसून आली.
रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर देखील शिवसेनेतील परिस्थिती तीच होती. मात्र ही परंपरा खंडित करण्याचे मोठे आव्हान इंगवले यांच्यासमोर आहे. शिवाय नाराज झालेले संजय पवार हे आगामी काळात कोणत्या भूमिकेत असणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
शिवसैनिकांनी सुरुवातीपासूनच इंगवले यांचे नेतृत्व मानले आहे. मात्र पक्षात नेतृत्वाचा आदर्श ठेवण्याची भूमिका शिवसैनिकांना इंगवले यांनी पटवून दिली पाहिजे. शिवसैनिकांच्या मनात विश्वासाचा स्थान निर्माण करूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे हे नक्की मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.