उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण : शहाजीबापूंची जहरी टीका!

Shahajibapu patil : "बीकेसीवर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. आमचाच मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल"
Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu Patil Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : शिवसेना (shiv sena) आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा (dussehra rally) हायव्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच, आता सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण दिल्याचा दावा केला आहे. यामुळे आता शहाजीबापूंच्या या टीकेवर शिवसेना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे.

"शिवाजी पार्कवर होणारा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसला आंदण दिला आहे," अशी जहरी टीका शहाजीबापू यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या बीकेसीवर दसरा मेळावा पार पडणार आहे. यात मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. यासाठी एकट्या सोलापूरातून 30 हजारापेक्षा जास्त शिवसैनिक मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला - महाविकास आघाडीला आंदण दिला आहे, असं शहाजी बापू यांनी म्हंटले आहे.

Shahaji Bapu Patil
शिंदे गटाची नवी चाल? डमी उमेदवार देऊन करणार शिवसेनेची कोंडी!

उद्या पार पडणाऱ्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे. तर आमच्या बीकेसीच्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे आमचाच मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा दावा शहाजीबापू यांनी केला आहे.

Shahaji Bapu Patil
Shivsena Dasara Melava फडणवीस म्हणाले, मी दोन्ही गटाची दसरा मेळाव्याची भाषणे ऐकणारं नाही...

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे व शिंदे गटाकडून गर्दी जमवण्याची जोरदार चढाओढ सुरु आहे. राज्यभरातून वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्यासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. लहान-मोठ्या अशा जवळपास दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सहा हजार एसटी तसेच खासगी बसेस दसरा मेळाव्यासाठी बुक करण्यात आल्या आहे.

शिवसेनेच्या इतिहासात यंदा प्रथमच दोन गटांचे स्वतंत्र दसरा मेळावे होणार आहेत. दोन्ही गटांनी गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला असल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com