Ujwala Thite : उज्वला थिटेंच्या वकिलाचा कोर्टात मोठा दावा; ‘अनगरमध्ये कायद्याचे पालन झाले नाही...’

Anagar Nagar Panchyat Election 2025 : अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्वला थिटे यांचा फॉर्म छाननीत बाद झाला. त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या वकिलांनी छाननीदरम्यान कायद्याचे पालन झाले नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Ujwala Thite
Ujwala Thite Sarkartnama
Published on
Updated on
  1. अनगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्वला थिटे यांची छाननीत उमेदवारी बाद झाली.

  2. थिटे यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून सोमवारपासून युक्तिवादाला सुरुवात झाली आहे.

  3. सुनावणीदरम्यान थिटे यांच्या वकिलाने निवडणूक प्रक्रियेत "कायद्याचे पालन झाले नाही" असा गंभीर दावा न्यायालयात केला.

Solapur, 25 November : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार उज्वला थिटे यांचा छाननीत बाद करण्यात आला. त्याविरोधात थिटे यांनी न्यायालयात धाव घेतली. थिटे याचिकेवर सोमवारपासून युक्तिवाद सुरू आहे. त्यात थिटे यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान मोठा दावा केला आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या काळात ‘कायद्याचे पालन झाले नाही,’ असा दावा वकिलाने केला आहे.

दरम्यान, गेली दोन दिवसांपासून जिल्हा न्यायालयात उज्वला थिटे (Ujwala Thite) यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. थिटे यांच्या वतीने वकिलाने युक्तीवाद करताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर बोट ठेवण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू असलेली सुनावणी आज मंगळवारीही वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही. त्याची अंतिम सुनावणी उद्या बुधवारी होणार आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अनगर (Angar) नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार राजन पाटील यांची धाकटी सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे, तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीत सूचकाची सही नसल्याचे कारण देत उज्वला थिटे यांचा बाद करण्यात आला. त्याविरोधात थिटे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उज्वला थिटे यांच्या अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नाही, असे सांगून अर्ज नामंजूर केल्यानंतर त्याविरुद्ध थिटे यांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अपिलावर सोमवारी, मंगळवारी अशी दोन दिवस युक्तिवाद दोन्ही बाजूंकडून करण्यात आला. त्यामुळे कोर्टाचा नेमका निर्णय काय येतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Ujwala Thite
Karad Politic's : चार वर्षांपूर्वीची भळभळती जखम बाजूला ठेवून उदयसिंह उंडाळकरांचा बाळासाहेब पाटलांशी पुन्हा दोस्ताना

कोर्टात युक्तीवाद करताना उज्वला थिटे यांचे वकिल म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार अपील दाखल असलेल्या ठिकाणची अर्ज माघारीची प्रक्रिया थांबवायची असते. पण, त्यांनी घाई घाईने लगेचच अर्ज माघारीची प्रक्रिया पार पाडली. त्या ठिकाणी कायद्याचे पालन झालेले नाही, अशी हरकत थिटे यांच्या वकिलांनी घेतली आहे. मंगळवारी (ता. २५ नोव्हेंबर) थिटे यांच्या अपिलावर सुनावणी झाली. पण, वेळेअभावी त्यावरील अंतिम सुनावणी उद्या (बुधवारी, ता. २६ नोव्हेंबर) ठेवली आहे.

Ujwala Thite
Eknath Shinde Politic's : सोलापुरात भाजपला एकनाथ शिंदेंची शिवसेना देणार टशन; उपमुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला शिवसैनिकांसाठी 'बूस्टर डोस'
  1. प्र. उज्वला थिटे यांची उमेदवारी का बाद झाली?
    उ: छाननी प्रक्रियेत काही आक्षेपांमुळे त्यांची उमेदवारी बाद करण्यात आली.

  2. प्र. त्यांनी काय पाऊल उचलले?
    उ: त्यांनी उमेदवारी बाद केल्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.

  3. प्र. न्यायालयातील युक्तिवादात काय दावे करण्यात आले?
    उ: थिटेंच्या वकिलाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान "कायद्याचे पालन झाले नाही" असा दावा केला.

  4. प्र. युक्तिवादाची प्रक्रिया कधी सुरू झाली?
    उ: सोमवारपासून न्यायालयात युक्तिवाद सुरू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com