Rohit Patil : "हिमाचलप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी बसवल्याशिवाय..." ; रोहित पाटलांचे मोठे विधान!

OLd Pension Scheme : "महाराष्ट्राचे दिवस बदलल्याशिलाय राहणार नाही.."
Rohit Patil : Devendra Fadnavis : Eknath Shinde : OLd Pension Scheme News
Rohit Patil : Devendra Fadnavis : Eknath Shinde : OLd Pension Scheme NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangali News : जुनी पेंशन योजना या मागणीसाठी अधिकाधिक जोर वाढू लागला आहे. जुनी पेंशन योजना लागू करावी. सद्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनातच याला मान्यता देण्यात यावी, अन्यथा १४ मार्च पासून सगळ्या प्रशासन व्यवस्था ठप्प होणार आहेत, असा इसारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत सरकारला इशारा दिला आहे.

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकरारला जुनी पेंशन योजना लागू करावीच लागणार, असे वक्तव्य रोहित पाटील यांनी केले आहे. जुनी पेंशन लागू न केल्याने हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना घरी बसावं लागलं, तेच महाराष्ट्रात घडल्याशिवाय जुनी पेंशन लागू होणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

Rohit Patil : Devendra Fadnavis : Eknath Shinde : OLd Pension Scheme News
Devendra Fadanvis: शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु करणार

रोहित पाटील म्हणाले, "जुनी पेंशनसाठीच्या मोर्चा निमित्ताने का होईना, महाराष्ट्राचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चितपणे सांगतो. काही ठिकाणी मला वाचायला ही मिळालं. या राज्यातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी जुनी पेंशन लागू होणार नाही, राज्य दिवाळखोरीत निघेल, असं वक्तव्य केलेलं आहे. आता हिमाचलमध्ये त्यांच्या माजी मुख्यंमंत्र्यांना घरी बसावं लागलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा तेच घडलं तरच, जुनी पेंशन योजना लागू होणार आहे,असं वक्तव्य रोहित पाटील यांनी केली आहे."

Rohit Patil : Devendra Fadnavis : Eknath Shinde : OLd Pension Scheme News
Rohit Patil : राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोण असेल? : रोहित पाटलांनी दिले हे उत्तर....

दरम्यान आज सांगलीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन लागू करावी, या मागणीसाठी मोर्चा निघाला. अनेक जिल्ह्यातून शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com