Congress Corporator Firing In Air: वाद मिटवायला गेलेल्या काँग्रेस नगरसेवकाच्या हॉटेल अन्‌ गाडीवर दगडफेक : नगरसेवकाचा हवेत गोळीबार

सांगलीतील शासकीय रुग्णालय परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangli Congress Corporator News: दोन मुलांमधील भांडणे सोडविण्यास गेलेल्या रागातून तरुणांच्या टोळक्याने सांगलीतील काँग्रेसचे नगरसेवक मयूरेश पाटील यांचे हॉटेल आणि गाडीवर दगडफेक केली. तसेच, पाटील यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी नगरसेवक पाटील यांनी हवेत दोन राउंड फायर केले. त्यामुळे सांगलीतील शासकीय रुग्णालय परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. (Stone pelting on corporator's hotel and car in Sangli, firing of corporator in the air)

सांगली (Sangli) शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आठ जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार फिर्यादीत समीर रसूल कटकेवाडी, अनिकेत आकाशदीप साबळे, बंडू केंगार, रियाज अपरासे यांच्यासह सात ते आठ अनोळखींचा समावेश आहे.

Crime News
Thackeray Vs Shinde राऊतांच्या प्रतिमेला एकीकडे जोडे मारले, तर दुसरीकडे दुग्धाभिषेक केला : शिरूरमध्ये शिंदे-ठाकरे गट आमने सामने

काँग्रेसचे (Congress) नगरसेवक मयूरेश पाटील यांचा सांगलीच्या शासकीय रुग्णालय परिसरात एमपी लॉज आहे. पाटील हे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करत होते. त्याचवेळी दोन मुले एका मेडिकल दुकानासमोर भांडत होते. ते बघून पाटील हे त्या दोन तरुणांचे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी त्यातील एका तरुणाने नगरसेवक (corporator) पाटील यांची कॉलर धरली. आमच्यामध्ये तू का पडला आहेस, असं म्हणत त्याने धारदार हत्यार काढले.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. संबंधित प्रकरणावर माफी मागून पडदा टाकण्यात आला. त्यानंतर मयूरेश पाटील हे घरी आले, त्यावेळी त्यांना बंडू केंगार नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तो म्हणाला की, आमच्या पोरांना पोलिस ठाण्यात नेऊन मारहाण केली, हे चुकीचे केले. त्यानंतर केंगारे याने फोन रिजाकडे दिला. त्यानेही ‘तुम्ही कशाला मध्ये पडला, हे बरोबर केले नाही’ असे पाटील यांना ऐकवले. त्यावर नगरसवेक पाटील यांनी ‘आपण उद्या सकाळी बोलू’ असे सांगून फोन ठेवून दिला.

Crime News
Baramati Loksabha : बारामतीत राजकीय हालचालींना वेग; केंद्रीय मंत्र्यांपाठोपाठ सुप्रिया सुळेही इंदापुरात, पाटलांच्या गावात जाणार

दरम्यान, संशयित आठ ते दहा जणांनी रात्री उशिरा पावणेबाराच्या सुमारास पाटील यांच्या लॉजवर दगडफेक केली. ही माहिती लॉजमधील कामगारांनी पाटील यांना दिली. त्यानंतर नगरसेवक पाटील हे ताबडतोब परवानाधारी रिव्हॉल्व्हर घेऊन लॉजकडे निघाले. पाटील हे लॉजजवळ आले असता दोन अल्पवयीन मुलांनी ‘आम्हाला मारले आहे, त्यांना सोडू नका’ असे म्हणत रॉड, चाकू आणि दगड घेऊन पाटील यांच्या दिशेने धावले. त्यावेळी पाटील यांनी रिव्हॉल्व्हरमधून एक राउंड हवेत गोळी झाडली.

पाटील यांनी गोळीबार करताच जमावाने हॉटेलच्या दिशेने पुन्हा दगडफेक केली. त्यातही कामगार आणि नगरसेवक पाटील हे हॉटेलमध्ये गेले. त्याचवेळी जमावाने हॉटेलच्या कामगाराला मारहाण सुरू केली. त्यावेळीही पाटील यांनी लॉजमधून पुन्हा एक राउंड हवेत फायर केला. तो आवाज ऐकून पेट्रोलिंग करणाऱ्या बीट मार्शल घटनास्थळी आले. पोलिस बघताच जमाव पसार झाला.

Crime News
Padalkar On Sharad Pawar : पडळकर पुन्हा पवारांवर घसरले; एकेरी उल्लेख करत या वर्षी चौंडीत न येण्याचे कारण विचारले

सांगली शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी माहिती मिळताच पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, गोळीबाराच्या घटनेने सांगली शहर हादरून गेले.

नगरसेवकावरही गुन्हा दाखल

पिस्तूल काढून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबद्दल सांगली शहर पोलिस ठाण्यात नगरसेवक मयूरेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com