Baramati Loksabha : बारामतीत राजकीय हालचालींना वेग; केंद्रीय मंत्र्यांपाठोपाठ सुप्रिया सुळेही इंदापुरात, पाटलांच्या गावात जाणार

बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्याचा चंग भाजपने बांधला आहे.
Supriya Sule -Pralhad Singh Patel
Supriya Sule -Pralhad Singh PatelSarkarnama

Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेचा केला आहे. त्यातूनच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांचे दौरे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे आज सभा मेळाव्याच्या निमित्ताने दौंड-इंदापुरात मतदारांशी संपर्क साधत आहेत. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेही इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावात त्या येणार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. (Union Minister Pralhad Singh Patel and Supriya Sule on a visit to Indapur today)

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात (Loksabha) विजय मिळविण्याचा चंग भाजपने (BJP) बांधला आहे. त्यातूनच या मतदारसंघाची राजकीय जबाबदारी ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनीही अनेकदा मतदारसंघात दौरे केले आहेत. भाजपकडून पक्षीय बांधणी आणि केंद्रीय योजनांचा प्रसार जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम केले जात आहे.

Supriya Sule -Pralhad Singh Patel
Padalkar On Sharad Pawar : पडळकर पुन्हा पवारांवर घसरले; एकेरी उल्लेख करत या वर्षी चौंडीत न येण्याचे कारण विचारले

सीतारामन यांच्याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडेही या मतदारसंघाची कमान दिली आहे. पटेल यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपचा आढावा घेतला आहे. बूथरचना सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला आहे. यापूर्वी त्यांनी भोर, वेल्हे, मुळशी या भागात लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मतदारसंघाच्या पूर्वेकडे वळविला आहे.

Supriya Sule -Pralhad Singh Patel
Ajit Pawar News : ‘लाँग मार्च’ काढून प्रश्न सुटत नसतात; अजित पवारांचा ‘CPM’च्या जे. पी. गावितांना टोमणा

पटेल हे आज दौंड, इंदापूर या तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या तालुक्यांत ते सभा, मेळावे आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी मंत्री, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पटेल यांच्या दौऱ्यात भाजप शक्तीप्रदर्शन करण्याची संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट हेाते.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळेही (Supriya Sule) आज बारामती मतदारसंघात असणार आहेत. त्या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर (Indapur) तालुक्यात भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावासह नीरा-नरसिंहपूर आदी गावांत त्या दौरा करणार आहेत. तसं पहायला गेले तर बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. कारण, या मतदारसंघात आता राष्ट्रवादी आणि पूर्वी काँग्रेस उमेदवाराचा पराभ झालेला नाही.

Supriya Sule -Pralhad Singh Patel
Solapur News : बच्चू कडू वाढविणार शिंदे-फडणवीसांचे टेन्शन : सोलापुरातील तीन मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड जिंकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. त्यासाठी बूथ पातळीपासून विविध गोष्टींचा अवलंब करत भाजपची ताकद वाढविण्याचे निश्चित केले आहे. एकंदरीतच बारामतीत लोकसभा निवडणूकीपुर्वीच राजकारण चांगलेच तापू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com