
Sangli News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. आता भाजपने दिल्ली काबीज केल्याने राज्यातील भाजप नेत्यांचा उत्साह दुनावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आतापासून तयारी करायला हवी. त्याचअनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तयारी सुरू केली आहे. याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी बैठकांचा जोर वाढला असून आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढवू, असा निर्धार केला आहे.
राज्यातील आगामी महापालिका, जिल्हापरिषद आणि नगपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरचिटणीस बाळासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी मीरा भाईंदरच्या निरीक्षकपदी हायुम सावनूरकर यांची व प्रदेश सदस्यपदी वैभव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाले, ‘शरद पवार यांच्या विचाराने आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील, मानसिंगराव नाईक, सदाशिवराव पाटील यांच्यासह सर्वच मान्यवरांच्या सहकार्याने सामान्य माणसाला ताकद देऊन या पुढे काम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
सत्ताधारी केंद्र व राज्य सरकार जनतेच्या प्रश्नापेक्षा आरएसएसचा अजेंडा राबवत आहे. जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू. अनेक घटकांना न्याय देऊ, सर्वच नेते मंडळी आपल्या पाठीशी असल्यामुळे कुणीही निराश थवा खचून जाऊ नये.’ असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील आगामी महापालिका, जिल्हापरिषद आणि नगपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आले असून दिल्लीत देखील आता भाजपची सत्ता आली आहे. यामुळे दिल्लीत एकमेकांच्या पायात पाय घालून आप आणि काँग्रसने स्वत:चे नुकसान केले आहे. दिल्लीत खेकडा वृत्ती दाखवल्यानेच भाजपला 27 वर्षानंतर पुन्हा दिल्लीवर कमळ फुलवण्याची संधी मिळाली आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही सगळ्यात मोठी परीक्षा असणार आहे.
या बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, अनिता सगरे, महिला जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, प्रदेश सदस्य ताजुद्दीन तांबोळी, अमोल शिंदे, टी. व्ही. पाटील, कमलताई पाटील, राजू पाटील, विजय पाटील, विश्वासराव पाटील, वास्कर शिंदे, जयदीप यादव, किसन जानकर, राजू पाटील, गजानन पाटील, प्रदीप पाटील, बाळासाहेब पाटील, उत्तम चव्हाण, आयुब बारगीर, कृष्णा मंडले, कुमार लोंढे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.