Uttam Jankar : ‘असली नालायक संस्कृती भाजपत खपवून घेणार नाही, हे शब्द महाराष्ट्राला ऐकायचे होते’

Sangli Morcha : आमदार उत्तम जानकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना दिलेल्या सौम्य पाठिंब्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला.
Uttam Jankar
Uttam JankarSarkarnama
Published on
Updated on
  1. आमदार उत्तम जानकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला की त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधानावर मवाळ भूमिका घेतली.

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या निषेध मोर्चात बोलताना जानकर यांनी फडणवीसांनी पडळकर यांना जाहीर फटकारले पाहिजे होते, पण तसे न केल्याने महाराष्ट्रात नाराजी असल्याचे सांगितले.

  3. जानकर यांनी हा मुद्दा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान असल्याचे सांगून, या प्रवृत्तीचा अंत होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा दिला.

Sangli, 22 September : तुम्ही गृहमंत्री आहात आणि असल्या वाचाळवीरांचं (गोपीचंद पडळकर) तुम्ही जाहीरपणे समर्थन केलेले आहे. त्याची महाराष्ट्राच्या मनामनांमध्ये चीड आहे. त्याला दारातसुद्धा उभं करायलं नाही पाहिजे होतं. असली नालायक संस्कृती भाजपमध्ये खपवून घेणार नाही, हे शब्द महाराष्ट्राला ऐकायचे होते. अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांच्याबाबत मवाळ भूमिका घेणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आमदार उत्तम जानकर यांनी हल्लाबोल केला.

आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मोर्चासमोर बोलताना आमदार जानकर यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली.

उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात. असल्या वाचाळवीरांना तुम्ही दारातसुद्धा उभं करायला नाय पाहिजे हेातं. पण तुम्ही त्याचं समर्थन केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. असली नालायक संस्कृती भाजपमध्ये खपवून घेणार नाही, हे शब्द महाराष्ट्राला ऐकायचे होते. या बहाद्दारांनी त्यांच्याबाबत म्हणायला पहिजे होतं. पण, तो फार उंचीचा नेता होणार आहे आणि त्याने शब्द जपून वापरायला पाहिजे, असे ते म्हणाले. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

सांगलीतून भडकलेला ज्वालामुखी आता थांबणार नाही. त्याने सुरूवात करून आता वेग पकडला आहे, या ठिकाणाहून त्याची सुरुवात झाली आहे. हा उभा महाराष्ट्र पेटल्याशिवाय आणि या प्रवृत्ती ठेचल्याशिवाय थांबणार नाही, असा इशाराही आमदार उत्तम जानकर यांनी दिला.

Uttam Jankar
Bhujbal Advice to Munde : धनंजय मुंडेंना छगन भुजबळांचा सल्ला; ‘तोपर्यंत हे काम करा; गोपीनाथ मुंडेंचे स्वप्नही साकार होईल’

आमदार जानकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात झालेले हे पहिले बंड आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या विरोधात बोललं जातं. हिंदू खतरें मे है, असं सांगितलं जातं. मग तुमचं सरकार आणि तुमच्या पक्षाचा आमदार ह्याचं काय काम आहे.

प्र. के. अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांना निपुत्रिक म्हटले होतं, मात्र, यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा त्याचे कारण सांगितले, तेव्हा अत्रेंनी जाहीरपणे माफी मागितली होती. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण, सांगली जिल्ह्यात गलिच्छ विचारांचं थैमान मांडलं आहे, असे आमदार जानकर यांनी नमूद केले आहे.

Uttam Jankar
Ajit Pawar On Munde: धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिपदासाठी तटकरेंकडे 'लॉबिंग'; अजितदादांची सूचक प्रतिक्रिया आली समोर
  1. प्र: उत्तम जानकर यांनी कोणावर टीका केली?
    उ: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर.

  2. प्र: जानकरांची मुख्य नाराजी कोणत्या कारणामुळे होती?
    उ: फडणवीस यांनी पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधानावर कठोर भूमिका न घेतल्यामुळे.

  3. प्र: निषेध मोर्चाचे आयोजन कोणी केले होते?
    उ: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने.

  4. प्र: जानकरांनी पुढील आंदोलनाबाबत काय सांगितले?
    उ: महाराष्ट्रातील ही प्रवृत्ती संपेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com