
Solapur, 12 April : मला आज वसंतराव नाईक यांची खूप आठवण येते. मुख्यमंत्री कधी पोटनिवडणुकीच्या प्रचारात जात नाहीत. पण, वसंतराव नाईक करमाळ्याच्या पोटनिवडणुकीत माझ्यासाठी आले होते, तिथेच त्यांनी मला मंत्री करण्याचा शब्द दिला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी मला राज्यमंत्री केलं. असे वसंतराव नाईक हे शब्दाचे पक्के होते. त्यांनी मला 1974 मध्ये दहा हजार रुपये दिले होते, कार्यकर्त्याला कशाची गरज आहे, हे ओळणारे नेते होते, अशी आठवण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितली.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या हस्ते (स्व.) चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पृर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. ते म्हणाले, चंद्राम गुरुजींच्या सानिध्यात राजकारणात मी वाढलो. आमच्यासाठी ते जणू साक्षात दैवत होते. माझ्या दोन्ही निवडणुकांत ते काम करायचे.
देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सोलापुरात (Solapur) तीन गुरुजींचं राज्य होतं. एक चंद्राम गुरुजी, दुसरे जाधव गुरुजी आणि तिसरे कमळे गुरुजी यांचा त्यात समावेश होता. या तिघांनी मागासगर्वीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले. चंद्राम गुरुजी हे दृष्टी असलेले शिक्षक होते. नेहरू यांच्या नावाने त्यांनी ही वसाहत उभारली. सर्वधर्म समभावाचं रोपटं त्यांनी या ठिकाणी लावलं, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, एकदा मी वसंतराव नाईक यांना भेटायला गेलो, तेव्हा साहेब वर रूममध्ये गेले होते. शिपायाने त्यांना निरोप दिला, तेव्हा ते रूममधून परत आले आणि भेटल्यानंतर त्यांनी मला एक पाकीट दिलं. त्यांनी मला 1974 मध्ये दहा हजार रुपये दिले होते. कार्यकर्त्याला कशाची गरज आहे, हे ओळणारे ते नेते होते, त्याचं वेळी सांगितलेलं की मी तुझ्या प्रचारालाही येतो.
मी एक पोलिस अधिकारी होतो. मंत्री आले की त्यांना नमस्कार करायचं. पण कोणाला माहिती होतं की, एक दिवस मलाही नमस्कार करतील. हे केवळ वसंतराव नाईक यांच्यामुळे मला भाग्य लाभलं. नाईक हे दूरदृष्टी असलेला नेता होते. चंद्राम गुरुजीही असेच होते. चंद्राम गुरुजी हे श्री कृष्णाच्या गोष्ट सांगायचे. रात्री 2-2 पर्यंत ते माझ्यासाठी प्रचार करत होते. अशा आठवणी दाटून येतात, असेही माजी मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
बंजारा समाजाच्या मुलासाठी चंद्राम गुरुजी यांनी सैनिक शिक्षणाच्या संस्था सुरु केली. गुरुजी गेल्यानंतर त्यांचा मुलगा या संस्थेचे नेतृत्व करतोय. गुरुजींच्या पुतळ्याचे लोकर्पण करताना भावना दाटून आल्या होत्या, आम्हा मागासवर्गीय लोकांसाठी त्यांनी अनेक कष्ट घेतलं आहे, अशीही आठवण शिंदे यांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.