Shivsena UBT : पोस्टर फाडले उद्धव ठाकरेंचे; पण सोलापूर उपशहरप्रमुखावर गुन्हा दाखल झाला ‘या’ कारणांमुळे

Solapur Crime News : वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध केल्याच्या कारणावरून ओंकार चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत त्यांचा निषेध केला होता. तसेच, हुतात्मा चौकात ठाकरे यांचे पोस्टर फाडले होते.
Solapur Shivsena UBT
Solapur Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 April : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडणाऱ्या सोलापूर उपशहरप्रमुख ओंकार चव्हाण यांच्यासह पाच जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले असले तरी मनाई आदेश असूनही सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे व इतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी चव्हाण यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पोलिस (Police) कॉन्स्टेबल प्रवीण भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार ओंकार चव्हाण, विशाल पवार, अभिषेक चव्हाण, सोनू चव्हाण या चौघांसह इतर दोन तीन व्यक्तींविरोधात शनिवारी (ता. १२ एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सोलापूर शहरात (Solapur) ३० मार्च ते १३ एप्रिलदरम्यान सोलापूर शहारात सार्वजनिक रितीने घोषणा देणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना विनापरवाना एकत्र येणे, सभा घेणे, आदी गोष्टींना मनाई आहे. हा मनाई आदेश असतानाही ओंकार चव्हाण आणि त्यांचे साथीदार गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास हुतात्मा चौकात एकत्र आले होते. कोणतीही परवानी नसताना उद्धव ठाकरे मुर्दाबाद, उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. तसेच, उद्धव ठाकरे यांचा फोटोही फाडला.

Solapur Shivsena UBT
Mohite Patil Bank : मोहिते पाटलांना धक्का; शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द, प्रशासक नेमण्याचा आदेश

सोलापूर शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओंकर चव्हाण यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो फाटल्याचीही तक्रार शिवसैनिकांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून ओंकार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध केल्याच्या कारणावरून ओंकार चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत त्यांचा निषेध केला होता. तसेच, हुतात्मा चौकात ठाकरे यांचे पोस्टर फाडले होते. त्यावरून सोलापूरमध्ये कालपासून घडामोडी घडत आहेत. ओंकार चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पोलिसांत तक्रार दिली होती.

Solapur Shivsena UBT
Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना वाद्‌ग्रस्त सल्ला, म्हणाले, ‘आम्ही जसं पक्षाचे लोक फोडतो; तसं तुम्ही विद्यार्थी फोडा’

ओंकार चव्हाण यांनी काय म्हटले होते?

वक्फ सुधारणा कायद्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध केला जात आहे. त्याचा मी पक्षाचा उपशहरप्रमुख म्हणून निषेध करतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जुन्या वक्फ कायद्याचे समर्थन करून नव्या सुधारणाला विरोध करत आहेत. हिंदूंची अनेक मंदिरे ‘वक्फ’च्या नावाखाली लुटली गेली आहेत. अशा कायद्याचा आणि अशा हिंदुत्ववादी नेत्याचा मी निषेध करतो. पक्षनेतृत्वाच्या भूमिकेचा निषेध म्हणून माझ्या उपशहरप्रमुखपदाचा आणि शिवसेनेचा राजीनामा देत आहे, असे ओंकार चव्हाण यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com