Mahayuti News : नाराज सुधीरभाऊंचे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीवर मोठे भाष्य...

Eknath Shinde Displeasure Issue : पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदे हे नाराज आहेत की नाही, हे मी कसं समजायचं. कारण, माझा काही संपर्क आता राहिलेला नाही.
Eknath Shinde-Sudhir Mungantiwar
Eknath Shinde-Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur, 19 January : पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, याबाबत मला काहीही माहिती नाही. उपमुख्यमंत्री शिंदे हे नाराज असतील तर भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलतील. माझा दुरान्वये संबंध ना उत्तराशी आहे ना कृतीशी आहे, अशा शब्दांत महायुतीमधील वादाबाबत मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले.

शिवसेनेच्या (Shivsena) तीन मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी न मिळाल्याने शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय रायगडचे पालकमंत्रिपदही भरत गोगावले यांना न मिळाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले आहेत, त्यामुळे शिंदे गटाच्या नाराजीची मोठी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या वादावर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे.

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदे हे नाराज आहेत की नाही, हे मी कसं समजायचं. कारण, माझा काही संपर्क आता राहिलेला नाही. मी आपला आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून कामे करत आहेत. एकनाथ शिंदे नाराज असतील तर भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलतील. माझा दुरान्वये संबंध ना उत्तराशी आहे ना कृतीशी आहे.

Eknath Shinde-Sudhir Mungantiwar
Western Maharashtra : पालकमंत्री वाटपात भाजपची धूर्त खेळी; बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी हद्दपार, मित्रपक्षांवर भिस्त!

शिर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले. त्यावर सुधीरभाऊंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्याकडे जी माहिती आहे. ती माहिती ते कधीतरी देत असतात. खरं तर आता त्या पहाटेच्या शपथविधीचे औचित्य राहिले नाही. पहाटेच्या शपथविधीचे कवित्व आता संपलेले आहे. आम्ही आता एकत्र आहोत. नवीन सरकार आलं आहे.

Eknath Shinde-Sudhir Mungantiwar
Maharashtra Politic's : फडणवीसांनी बावनकुळेंना अजितदादा, एकनाथ शिंदेंच्या पंक्तीत आणून बसवले

खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, हे जनतेने सिद्ध केले आहे. खरी शिवसेना कोणाची हेही जनतेने सिद्ध केले आहे. आता जुन्या आठवणी काढून शपथविधीच्या संबंधात भाष्य करून कोणाचा फायदा होत असेल, असे मला वाटत नाही. अनेक लोक जेव्हा बोलायलं पाहिजे, तेव्हा ते बोलत नाहीत. नंतर कधीतरी आत्मचरित्र लिहितात आणि मला हे माहीत होतं, असं सांगतात. या पहाटेच्या शपथविधीवर खरा देशभक्त, राष्ट्रभक्त, पक्षभक्त तो आहे, खरा निष्ठावंत तो आहे, जो जेव्हा वाईट आहे, तेव्हा तो जाहीरपणे सांगतो. जर तुम्ही भीतीने तेव्हा सांगायचं नाही, त्याला काय अर्थ आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com