Vishal Patil : विशाल पाटलांना भाजपची पुन्हा ऑफर अन् शेवटचा इशाराही, चंद्रकांतदादा म्हणाले, 'निर्णय घ्या अन्यथा...'

BJP's Chandrakant Patil Offer Vishal Patil : सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी डाव टाकत एकाच गडात अनेक पक्षी मारले आहे. जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने वसंतदादा घराण्यातील पहिली व्यक्ती काँग्रेसमधून फोडून भाजपसोबत घेतलं आहे.
Vishal Patil And Chandrakant Patil
Vishal Patil And Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : आगामी स्थानिकसह विधानसभा आणि लोकसभेची तयारी भाजप आतापासूनच करताना दिसत आहे. जिल्ह्यासह राज्यात याची झलक पाहायला मिळत असून मोठ मोठ्या चेहऱ्यांसह जिल्हा पातळीवरील नेत्यांना भाजप आपल्याकडे खेचत आहे. सांगलीतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी असेच चेहरे हेरले असून एक एक करून त्यांचा पक्ष प्रवेश सुरू आहे. असाच पक्ष प्रवेश आता मुंबईत होणार असून वसंतदादांची नातसूनच आता भाजपमध्ये येणार आहे. चंद्रकांतदादांनी काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांच्यासाठी भाजपची दारं उघडली आहेत. आता त्यांनी आपला मोर्चा काँग्रेसचे नेते आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याकडे वळवला आहे. याआधी अनेकदा भाजप प्रवेशाचा प्रस्ताव विशाल पाटील यांना देण्यात आला आहे. आताही चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा त्यांना भाजपची ऑफर दिली आहे. तसेच शेवटची संधी असल्याचा इशाराही दिला आहे. ज्याची आता जिल्ह्यासह राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

जयश्री पाटील यांना काँग्रेसने निलंबित केल्यानंतर त्या राजकीय पुर्नवसनासाठी राजकीय पक्षांची चाचपणी करत होत्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात जातील अशा शक्यता तयार झाली होती. पण चंद्रकांत पाटलांनी डाव टाकला आणि त्या भाजपकडे वळाल्या आहेत. त्या बुधवारी (ता.18) भाजपमध्ये प्रवेश करतील. यामागची सर्व सुत्रे चंद्रकात पाटील यांनी हलवली होती. यानंतर त्यांनी खासदार विशाल पाटील यांना पुन्हा एकदा भाजपप्रवेशाबाबत विचारणा केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

याआधीही दोन ते चार वेळी चंद्रकांत पाटील यांनी तशी विचारणा केली होती. पण विशाल पाटील यांनी त्यास नकार दिला होता. पण आता पुन्हा एकदा बामणोली येथील शाळेत शालेय विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे कौतुक करत भाजपमध्ये येण्याचा विचार करावा अशी गुगली टाकली आहे. तसेच, "विशाल, तुझ्या घरी कधी येऊ’’ अशी विचारणाही केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पण विशाल यांनी पुन्हा एकदा हसत-हसत हा चेंडू सोडून दिला.

Vishal Patil And Chandrakant Patil
Vishal Patil : विशाल पाटलांना धक्का? 'दत्त इंडिया'च्या कारभारमुळे वसंतदादा कारखान्यावर गडांतर

बामणोली येथील शाळेचा प्रवेशोत्सव झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे जयश्री पाटील यांच्या भाजपप्रवेश तयारीची जबाबदारी होती. त्यासाठी ते वसंत बंगल्यात येणार होते. त्याआधी विशाल यांनी ‘दादा, काय नियोजन,’ असे विचारले. त्यावर ‘तुमच्याच घरी निघालोय,’ असे उत्तर दिले. त्यावर विशाल यांना ‘दादांचा कार्यक्रम’ काय आहे, हे लक्षात आले. विशाल यांनी ‘जावा, जावा’, असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर दादांनी ‘विशाल, तुझ्या स्वतःच्या घरी कधी येऊ,’’ असा सवाल करत आता लवकर भाजपचे माप ओलांडा, असे निमंत्रण दिले.

याबाबत पत्रकारांनी छेडले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘विशाल पाटील अभ्यासू खासदार आहेत, मात्र आक्रमण आणि थोडे आक्रस्ताळे आहेत. त्यात बदल केला पाहिजे, याची त्यांना जाणीव आहे आणि हा त्यांचा गुण मला आवडतो. त्यांच्या सारख्या व्यक्तीने भाजपमध्ये असायला हवे. आम्ही त्यांचे स्वागतच करू. वसंतदादा घराणे सुसंस्कृत आहे. प्रतीक काय किंवा विशाल पाटील काय, त्यांची राजकारणाची पद्धत ही सामान्य माणसाचे हित डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची आहे. भाजपचे तेच नेचर असल्याचे सांगितले.

Vishal Patil And Chandrakant Patil
Vishal Patil : ‘अलमट्टी’बाबतीत राज्य सरकार दुटप्पी, वडनेरे समितीचा चुकीचा अहवाल मान्य आहे का?; खासदार विशाल पाटलांचा खरमरीत सवाल

दरम्यान त्यांनी विशाल पाटील यांच्यासाठी भाजपची ऑफर आजही कायम आहे. पण त्यांनी याचा गांभिर्याने विचार न केल्यास 2029 च्या लोकसभेसाठी आम्ही उमेदवार तयार करू असाही इशारा दिलाय. तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनावर घेतलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com